अनाथ मुलांच्या स्वप्नपुर्तीसाठी पगारिया फाउंडेशनचा पुढाकार 

soacial-work
soacial-work

औरंगाबाद - अनाथ, दिव्यांग, अंध मुलांच्या स्वप्नपुर्तीसाठी पगारिया फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून, त्यांना विविध कोर्सेस, व्यक्तीमत्व विकास आदि निवासी प्रशिक्षण देण्याची सोय केली आहे. याबद्दल फाउंडेशनचे पुखरिया बजाज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

फाऊंडेशनतर्फे 18 वर्षे वयोगटावरील अनाथांना केंद्र सरकार पुरस्कृत तीन प्रकारचे मोबाईल रिपेअरिंग, डोमॅस्टिक डेटा इंट्री ऑपरेटर, ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्‍नीशियन आदि तीन ते सहा महिन्यांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येईल. 

पहिल्या टप्पात 75 जणांना प्रवेश देण्यात येणार असून नविन कोर्सेसही राबविण्यात येतील. अनाथांना केवळ नोकरी, रोजगार मिळवून देऊन स्वतःच्या पायावर उभा करण्याचा मानस नाही तर चांगला माणूस बनविण्यासाठी फाउंडेशनने पुढाकार घेतल्याचे तांत्रिक सल्लागार यर्जुवेंद्र महाजन यांनी सांगितले. आईवडिल नसल्याल्या अनाथाला प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, आईवडिल यापैकी एकच असणारे, अत्यंत गरिब परिस्थिती अशांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासोबतच संगीत, गाणे, खेळ असेही उपक्रम घेण्यात येणार आहेत. यावेळी राहूल बजाज, कुसूमताई बजाज, एस. पी. वैद्य उपस्थित होते. 

संवेदनशील "माणसे' व्हा 
माणूस नावाचे मुखवटे घातलेले माणसे आपल्याभोवती भेटतात. मात्र, माणसातले माणूसपण जाणून घेणारे कमीच. त्यामुळे आम्ही प्रशिक्षण देण्याऱ्या अनाथांना "माणूस' म्हणून बोला, त्यांना मायेचा आधार द्या, त्यांना पैसा देऊ नका, पण त्यांचे भावनिक पालकत्व स्विकारा, त्यांच्याशी आपूलकीने बोला, आजारपणात विचारपुस करा. आपण अनाथ आहोत ही भावना त्यांच्या मनात येणार नाही यासाठी फाउंडेशनसोबत संवेदनशील "माणसांनी' पालकत्व स्विकारण्याची आर्त साद फाऊंडेशनचे यर्जुवेंद्र महाजन यांनी घातली. 

इथे करा संपर्क 
अनाथांनी आपली नोंदणी करण्यासाठी 21 जूनपर्यंत पगारिया फाऊंडेशन, आरटीओ कार्यालयाशेजारी, स्टेशन रोड, औरंगाबाद या पत्त्यावर अर्ज पाठवावा. अधिक माहितीसाठी 0240- 2360777 आणि 8087537253 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com