शंभर झाडांवरून काढले चार किलो खिळे : काय आहे वेदनामुक्त झाड अभियान?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 डिसेंबर 2019

झाडांना अनेक कारणांमुळे खिळे मारलेले असतात. ज्याप्रमाणे मनुष्याला काहीही जखम झाली तर वेदना होते, अगदी त्याप्रमाणेच झाडांनाही वेदना होत असतात. झाडांना वेदनामुक्त करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे

औरंगाबाद : एमईसीसीअंतर्गत असलेल्या औरंगाबाद फर्स्ट या संस्थेतर्फे रविवारी (ता. 22) सकाळी 8 ते 11 दरम्यान वेदनामुक्त झाड (PainFreeTree) हे अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट या रस्त्यावरील आणि हिमायतबागेमधील महत्त्वाच्या झाडांना लावलेले सुमारे चार किलो खिळे काढण्यात आले. 

अभियानाची सुरवात एमईसीसी औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष मानसिंग पवार यांनी केली. औरंगाबाद फर्स्टसोबत मनपा उद्यान विभागाचे अधिकारी आणि मौलाना आझाद संस्थेचा ग्रीन क्‍लब या अभियानात सहभागी झाले होते. अभियानात सुमारे 100 झाडांवरील चार किलो खिळे काढण्यात आले तसेच त्यांना संसर्ग होऊ नये याकरिता मेण (वॅक्‍स) लावण्यात आले.

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

हिमायतबाग येथील बाओबाब (गोरखचिंच) या 150 वर्षे जुन्या झाडावरील सुमारे 200 खिळे काढून त्याला वॅक्‍स लेप लावण्यात आले. झाडांना अनेक कारणांमुळे खिळे मारलेले असतात. ज्याप्रमाणे मनुष्याला काहीही जखम झाली तर वेदना होते, अगदी त्याप्रमाणेच झाडांनाही वेदना होत असतात. झाडांना वेदनामुक्त करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे औरंगाबाद फर्स्टच्या गो ग्रीन कमिटीच्या अध्यक्ष प्रीती शाह यांनी सांगितले. 

हेही वाचा : video : अरेच्चा ! कोंबडीशिवाय जन्मतात पिले !  

अभियानात आनंद असोलकर, डॉ. विजय पाटील, हेमंत लांडगे, गोपीकिशन चांडक, डी. आर. निंबाळकर, निखिल भालेराव, अभिजित हिरप, रवी चौधरी, सिद्धार्थ इंगळे, ललित जाधव, मौलाना आझादचे नासीर सर, मुख्तार सर, मेहजबिन, डॉ. तरन्नूम मॅडम आणि कॉलेजचे विद्यार्थी तसेच अनेक वृक्षप्रेमी सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pain Free Tree Movement By Aurangabad Firts Marathi News