पैठण : शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना फुटले कोंब

तुटपुंजी मदत मिळाल्यास शेत विकण्याची वेळ : केकत जळगावच्या महिला शेतकऱ्याची व्यथा
 शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना फुटले कोंब
शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना फुटले कोंब sakal

पैठण : सुरुवातीच्या पावसाने आमच्या शेतात पिके चांगलीच बहरली होती. मात्र, नंतर अतिवृष्टीने आमच्या पिकांच्या स्वप्नांचा चुराडा केला. सततच्या पावसाने आमच्या शेतातल्या उभ्या पिकांना कोंब फुटल्याचे डोळ्यांनी पाहिले अन् मनावर जखम भळभळली साहेब.. आम्ही पिकांची आशा सोडली असून आता सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसले असून मोठी मदत पदरात पडली तरच पुढचं आयुष्य सोपे जगता येईल, नसता तुटपुंजी मदत मिळाल्यास आमच्यावर शेत विकण्याची वेळ येणार असल्याची कैफियत केकत जळगाव (ता.पैठण) येथील महिला शेतकरी आसराबाई घुले यांनी मांडली.

सकाळ प्रतिनिधीने थेरगाव येथे भेट दिली असता सर्वत्र उद्ध्वस्त शिवार दिसून आले. पावसाने पिकांचं होत्याचं नव्हतं केलं हे सांगताना घुले या महिला शेतकऱ्याने अक्षरशः हंबरडा फोडला. जड अंत ः कारणाने त्या म्हणाल्या, पै पै जोडून आम्ही शेतात मका, बाजरी, उडीद, मूग, भुईमूग, कापूस पीक घेतलं. मात्र, अतिवृष्टीची दृष्टी लागली अन् आमच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. कापणी केलेली बाजरी पाण्यात तरंगत आहे. कांदा व बियाणे सडू लागलीय, अशा परिस्थितीत आता आम्हाला शासनाकडून मोठ्या अपेक्षा आहे.

 शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना फुटले कोंब
लोणंद, खंडाळ्यात आंतरराज्य टोळीतील चौघांना अटक

एक महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने शेत जलमय करून टाकले रावा. आम्हाला आता कुठल्याही पिकाची शाश्वती राहिली नाही. शेतातील कपाशी ५० टक्के सडली तर, ३० टक्के काळी पडली. १० टक्के कपाशीने झाडावरच अंकुर फोडले. मक्याचीदेखील अशीच बिकट अवस्था झाली.

शेतात आजही फूटभर पाणी साचलेले असल्याने यंदा काहीच हाती लागणार नसल्याने संसार चालवायचा कसा, असा सवाल थेरगाव येथील शेतकरी बापूराव भुसारे यांनी उपस्थित केला. शासनाची मदत लवकर मिळाली तरच त्याचा फायदा होईल, नसता मदतीला उशीर झाल्यास आम्हाला कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शासनाने लवकरच भरपाई द्यावी, असेही हा शेतकरी म्हणाला.

 शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना फुटले कोंब
औरंगाबादेत बंधाऱ्यात कार बुडाली,एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

स्वप्नांवर पावसाने पाणी फिरविले

एक महिन्यापासून पावसाने पैठण तालुक्यात हाहाकार केला. त्यामुळे कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर या वर्षीच्या पावसाने प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूऐवजी दुःखाचे अश्रू वाहताना दिसत आहेत. एक महिन्यांपूर्वी चांगले दिवास्वप्न पाहणाऱ्या बळीराजाला एकच महिन्यात चारीमुंड्या चीत करत त्यांच्या स्वप्नांवर पावसाने पाणी फिरविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com