जायकवाडीत ३१ टक्के साठा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने पुन्हा आवक सुरू

पैठण - पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात पुन्हा पाणी येण्यास सुरवात झाली असून, रविवारी (ता. २३) धरणाचा पाणीसाठा ३१ टक्के झाला आहे. 

पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने पुन्हा आवक सुरू

पैठण - पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात पुन्हा पाणी येण्यास सुरवात झाली असून, रविवारी (ता. २३) धरणाचा पाणीसाठा ३१ टक्के झाला आहे. 

जायकवाडीच्या वरील भागातील धरणातून पाणी येत असून गोदावरीच्या नांदूर-मधमेश्‍वर धरणात दाखल होत आहे. या धरणातून ६१ हजार १३८ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यातून ४४ हजार क्‍युसेक पाणी येत आहे, अशी माहिती धरण सहायक अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. धरण पाणीपातळी १५०५.६० फूट, तर ४५८.९३४ मीटर झाली आहे. ४४ हजार १०० क्‍युसेक पाणी येणे सुरू आहे. धरणाचा एकूण साठा १,३७०.६९६ दशलक्ष घनमीटर झाला आहे. जिवंत पाणीसाठा ६३२.५९० दशलक्ष घनमीटर आहे.

नाशिक जिल्ह्यात गोदावरीला १५ जुलै रोजी पूर आल्याने धरणात नांदूर-मधमेश्‍वर धरणातून पाणी सोडण्यात आले. या वेळी धरणाचा पाणीसाठा १७ टक्‍क्‍यांवरून २० टक्के झाला होता. यानंतरही पाण्याची कमी-अधिक प्रमाणात आवक सुरू राहिल्याने संथगतीने साठ्यात वाढ झाली. मात्र, शनिवारी (ता.२२) पाण्याची मोठी आवक वाढली. त्यामुळे टक्केवारीत मोठी वाढ झाल्याचे सहायक अभियंता चव्हाण यांनी स्पष्ट केले.

वरील धरणांतील पाण्याची आवक
गंगापूर धरण     :     १४ हजार ९५९ क्‍युसेक
दारणा     :     १६ हजार ८७५ क्‍युसेक
पालखेड     :     निरंक
कडवा     :     आठ हजार ८५६ 
पुनेगाव     :     निरंक
वलदेवी     :     निरंक
मुळा     :     निरंक
भंडारदरा     :     निरंक
ओझरवेल     :     निरंक

Web Title: paithan news jayakwadi dam 31% water storage