सरकार म्हणजे घरात हातभट्टी आणि दारावर अगरबत्ती- बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

परभणीः हे सरकार म्हणजे घरात हातभट्टी आणि दारावर अगरबत्ती असे असून, राज्य शासनाने शेतकरी प्रश्नांचा तमाशा चालविला आहे, कर्जमाफीच्या योजनेला नाव छत्रपतींचे आणि निर्णय अफजलखानाचा अशी खरमरीत टिका प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आज (बुधवार) येथे केली.

परभणीः हे सरकार म्हणजे घरात हातभट्टी आणि दारावर अगरबत्ती असे असून, राज्य शासनाने शेतकरी प्रश्नांचा तमाशा चालविला आहे, कर्जमाफीच्या योजनेला नाव छत्रपतींचे आणि निर्णय अफजलखानाचा अशी खरमरीत टिका प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आज (बुधवार) येथे केली.

येथील श्रीकृष्णा गार्डन मंगल कार्यालयात आज शेतकरी संघटनाच्या सुकाणू समितीच्या वतीने शेतकऱ्यांचा यल्गार मेळावा पार पडला. त्यावेळी आमदार कडू बोलत होते. व्यासपीठावर शेतकरी संघटेनेचे नेते रघुनाथदादा पाटील, सुकाणू समितीचे निमत्रंक डॉ. अजित नवले, आमदार विजय भाबंळे, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, किशोर ढमाले, कालीदास आपेट आदी उपस्थित होते.

कडू म्हणाले, कर्जमाफीच्या मुद्यावर सरकार तिनदा अभ्यास करुनही नापास झाले आहे. शेतकरी इमानदारीचे फळ मागत आहे, सरकारने एकतर्फी सुरु केलेली दंगल असून त्याला सर्व राजकीय पक्ष जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाचे नेते शेतकऱ्यांची टवाळकी करतात, शेतकऱ्यांना जात असती तर रावसाहेब दानवे वाचले नसते असे सांगत दानवेंच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा खरपुच समाचार घेतला. छत्रपतींच्या नावाने कर्जमाफी आणि जीआर मात्र अफजलखानी अशी टिका करीत शेतकरी या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यास मागेपुढे पाहणार नाहीत असे त्यांनी बजावले. ज्या बॅंका पिक कर्ज कपात करीत आहेत अशा बॅंकेत घुसुन हणले जाईल असा इशारा कडू यांनी दिला. एवढे दिवस अनेक वाद पाहीले आता शेतकरी कट्टरवादाला सरकारला सामोरे जावे लागेल असे सांगत छत्रपतींचा अर्शिवाद शेतकरी आत्महत्या वाढविण्यासाठी घेतला का असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे. ता.23 जुले नंतर सरकारला शेतकऱ्यांच्या रुमण्यात काय ताकद असते ते दाखविली जाईल असेही ते म्हणाले. गंगाखेड शुगर्सच्या कर्ज घोटाळ्याची चौकशी राज्यशासनाने करावी अन्यथा गंगाजल काय असते ते तर दाखवले जाईल असा इशारा त्यांनी दिला.

सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची टिका रघुनाथ पाटील यांनी केली.यावेळी डॉ.ढवळे, ढमाले, वरपुडकर, आमदार भांबळे, आपेट आदींची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्तावीक स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या नेत्या रसिका ढगे यांनी केले. सुत्रसंचालन कॉ.विलास बाबर तर रामेश्वर पौळ यांनी आभार मानले.मेळाव्याला संपूर्ण कार्यालय खचाखच भरले होते.

आंदोलनाचा तिसरा टप्पा परभणी
येत्या 23 तारखेला पुण्यात सुकाणू समितीची बैठक होत असून त्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असून पुणतांबा, नाशीक नंतर आता आंदोलनाचा तिसरा टप्पा परभणीतून सुरु करणार असल्याची माहीती डॉ.अजित नवले यांनी दिली. हे अटीच सरकार असून सरकारच्या फसव्या कर्जमाफीला लाथ मारण्यासाठी आंदोलन असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: panbhani news bacchu kadu political attack on government