ज्येष्ठ नेते पंडितअण्णा मुंडे यांचे परळी येथे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016

परळी वैजनाथ - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितराव (अण्णा) पांडुरंगराव मुंडे (वय ७७) यांचे गुरुवारी (ता. १३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. शुक्रवारी (ता. १४) दुपारी दोनला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्यामागे पत्नी रुक्‍मिणीबाई, बहीण सरूबाई शेषेराव कराड, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पुत्र, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे-खाडे या पुतण्या, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे हे पुतणे, सून राजश्री मुंडे, ऊर्मिलाताई, रूमाताई, बाळाताई या तीन मुली, आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, त्रिंबकराव केंद्रे, पुरुषोत्तम केंद्रे हे जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पंडितअण्णा मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजताच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या. शहरात बाजारपेठ बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला. ‘पंढरी’ या त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी नऊला त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी एकला अंत्ययात्रा निघेल. दरम्यान, धनंजय मुंडे हे एका कार्यक्रमासाठी इंदूरला गेले होते. या घटनेचे वृत्त समजताच ते परळीकडे निघाले आहेत. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे याही मुंबईहून येथे निघाल्या आहेत.

Web Title: panditanna munde died at parli