पांगरा शिंदे येथे परत आला जमिनीतुन गुढ आवाज, कळमनुरी तालुक्यातील काही गावाचा समावेश

राजेश दारव्हेकर
Saturday, 13 February 2021

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात मागच्या काही वर्षापासून जमीनीतुन गुढ आवाज येत आहेत पुर्वी हे आवाज कधीतरी येत असत मागच्या दोन वर्षापासून आठ पंधरा दिवसाला हे आवाज येत आहेत.

हिंगोली : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे  गावासह  परिसरात कळमनुरी तालुक्यातील काही गावात शनिवारी (ता. १३) दुपारी  वाजून दोन वाजुन दोन मिनिटाला जमीनीतुन  मोठा गुढ आवाज झाला. 

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात मागच्या काही वर्षापासून जमीनीतुन गुढ आवाज येत आहेत पुर्वी हे आवाज कधीतरी येत असत मागच्या दोन वर्षापासून आठ पंधरा दिवसाला हे आवाज येत आहेत. दोन तेतीन वेळेस या गावात सौम्य भुकंपाचे धक्के बसल्याची भुकंप मापक यंत्रावर नोंद झाली आहे. 

हेही वाचा - विशेष स्टोरी : श्री गुरुग्रंथ साहिबमध्ये महाराष्ट्राच्या 'या' संतांच्या दोह्यांचा समावेश; जाणून घ्या, त्या संतांची महती

मागच्या आठ दिवसापुर्वी येथे भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. याबाबत गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनास देखील कळविले आहे. या प्रकाराने गावकरी भयभीत झाले आहेत. या आवाजाचे गुढ मात्र उकलता उकलेना दरम्यान, शनिवारी दुपारी दोन वाजुन दोन मिनिटाला येथे भला मोठा जमीनीतुन आवाज झाल्याने घरात बसलेले गावकरी रस्त्यावर आले. या आवाजाने कोणताही हाणी झाली नाही मात्र गावकऱ्यांतुन भिती निर्माण झाली आहे. हा आवाज पांगरा शिंदे गावासह, वापटी, कुपटी, खापरखेडा, सिरळी आदी गावात झाला तर कळमनुरी तालुक्यातील पोतरा, बोल्डा, सिंदगी आदी गावात याच वेळात झाला आहे. 

आठ दिवसापुर्वी पोतरा गावात झालेला आवाज हा भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला यानंतर गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे गावात या संदर्भात समिती नेमण्याची मागणी केली आहे. दरम्यान प्रशासनाने या आवाजाची दखल घेऊन गावकऱ्यांना मार्गदर्शन करत आवाजाचे गुढ उकलावे अशी मागणी केली जात आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pangra Shinde returned to the mysterious sound from the ground, including some villages in Kalamanuri taluka hingoli news