‘मी शांत आहे आणि मुक्त झाली आहे’; पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट

Pankaja Mude shares emotional post on fb after defeat
Pankaja Mude shares emotional post on fb after defeat

बीड : परळी मतदार संघातून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पराभवाच्या कारणांवर विविध पैलूंनी चर्चा होत आहे. मागच्या पाच वर्षांचा लेखा - जोखा काढण्यापासून ते ‘कथित क्लीपपर्यंत’ अनेक गोष्टींबद्दल चर्चा आहे. या सर्व मुद्द्यांना पोस्टच्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी स्पर्ष केला आहे.

पंकजा मुंडेंसाठी 'या' महिला आमदाराची मतदारसंघ सोडण्याची तयारी

बीड : मी माझा पराभव मान्य केला आहे. असं सर्व का झालं यावर मी चिंतन करेन लोकांना जाऊन भेटेन ही.. आता या विषयाला सर्वांनी विराम द्यावा..कोणी कोणावर आरोप करू नये, जबाबदारी ढकलू नये, निवांत आपली दिवाळी कुटुंबासोबत साजरी करा, असा सल्ला देत स्वर्गीय मुंडेंची शपथ ‘मी शांत आहे आणि मुक्त झाली आहे’ अशी भावनिक पोस्ट ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाने सोशल मिडीयावर फिरत आहे.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा परळी मतदार संघातून ३० हजार मतांनी पराभव झाला. जिल्ह्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या. मोदींची सभा तर परळीत झाली. मोदींच्या सभेनंतर उदयनराजे भोसले यांचीही सभा झाली. त्यानंतर धनंजय मुंडेंच्या भाषणाची एक कथित क्लीप व्हायरल झाल्यावरुन आरोप - प्रत्यारोप आणि भावनिक आवाहनेही झाली. त्यानंतर पंकजा मुंडेंच्या पराभवाचे विविध विश्लेषणे केली जात आहे. यात त्यांच्या मागच्या पाच वर्षांच्या कामकाजासह वरिल सर्व मुद्द्यांवर विश्लेषक चर्चा करत आहेत. पण, शुक्रवारी रात्रीपासून त्यांच्या नावाने असलेल्या काही समाजमाध्यमांतून त्यांच्या नावाने एक भावनिक पोस्ट फिरत आहे. 

पंकजा मुंडे यांची पोस्ट

राजकारणात सर्वेसर्वा असणाऱ्या मतदारांचा निर्णय अंतिम असतो. त्यामुळे त्यावर चर्चा उचित नाही. ज्यांनी मतदान केलेलं असतं त्या लोकांसाठी तो निर्णय योग्यच असतो!!! मी माझ्या प्रचाराच्या शेवटच्या सभेत स्पष्ट केलं होतं "मला मुक्त करा किंवा स्वतः मुक्त व्हा".. या राजकारणात मी यशस्वी होणं हा ही पराभव आहे असंही मला वाटत राहिलं....असेही त्या पोस्टमध्ये नमूद आहे. 19 ऑक्टोबरला 6 वाजता प्रचार संपला, नंतर मी घरी गेले ते  सरळ मतदानासाठीच बाहेर पडले 21 तारखेला सकाळी.. माझ्या निवडणुकीत ऐन महत्वाच्या दिवशीच मी घरी बसून राहिले ..गोपीनाथ गड येथे साहेबांचे दर्शन घेतले मध्ये आणि थेट मतदानाच्या सकाळीच बाहेर पडले.. मला मतं मिळाली नसतीलही ,मला मन जिंकताही आली  नसतील पण एक मात्र नक्की आहे ,’असत्य मला वागता आलं  नाही’हे शत्रूही कबूल करेल असेही पोस्टमध्ये लिहले आहे.  या पोस्ट च्या खाली येणारे ट्रोल विरोधक  जाहीरपणे नाही पण एकांतात मान्यच करतील ‘ताईना खोटं नाही जमलं...’ विश्वास ठेवा मी 'त्या 'क्लीप मधील वाक्याने जी घायाळ झाले 
ते उठलेच नाही.

मी सर्व प्रहार आणि संघर्ष भोगले पण हा वार जिव्हारी लागला  आणि ते जर बनावट असतं तर मी काही प्रभावित नसते झाले  हे ही नक्की ..इतकी मी प्रगल्भ नक्कीच आहे हो.. मंचावर त्या दिवशी मी खूप सावरलं स्वतःला, मीडिया ही गेला होता.. मी काही प्रवेश ही घेतले पण गाडीच्या दिशेने जाताना कोसळले, त्याबद्दल जरा अवघड वाटत आहे.. त्याचा अर्थ घेणारे घेतीलच पण जमलं तर विश्वास ठेवा ..माझ्या स्वाभिमानी स्वभावाला खूप लागलं, माझं कोलमडून पडणं अगदी निवडणूक हरल्या पेक्षाही लागलं. मी आजवर राजकीय जीवनात जे केलं ते लोकांसाठी त्या सर्व भावना आणि स्व.मुंडे साहेबांची शपथ घेऊन सांगते मी शांत आहे आणि मुक्त झाली आहे .. निकालाची जवाबदारी फक्त माझी आहे! हा पराभव ' पंकजा गोपीनाथ मुंडेंचा ' आहे कारण तो हवा होता अनेकांना म्हणूनच झाला असावा.. खूप काही जिल्ह्यासाठी स्वप्न होती ती राहिली सल एवढीच आहे .. फक्त साऱ्यांना वेठीला धरून राजकारण बंद व्हावं ..कोणीतरी शाश्वत विकासावर बोलावं आणि तो करावा .. नाहीतर उद्या लोक म्हणतील "ताई फोन उचलत नव्हत्या, भेटत नव्हत्या अशी चर्चा ऐकली होती, पण न फोन करता 
विकास दारात येत होता हे विचारात घेतलंच नाही." विकास निरपेक्ष आणि शाश्वत असावा ही इच्छा कोणीही पूर्ण करावी, त्यांना माझ्या शुभेच्छा ..
चला मग रजा घेते,सामाजिक कर्तव्यातून नाही पण पराभूत लोकप्रतिनिधी म्हणून ... पत्ता कळवते ..माझ्या घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतील.. काळजी घ्या स्वतःची आणि माझ्या जिल्ह्यातील विकासाची ..

अशा मजकूराने पोस्टचा शेवट झालेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com