धनगरांना आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयाची पायरी चढणार नाही - पंकजा मुंडे

धनगरांना आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयाची पायरी चढणार नाही - पंकजा मुंडे

नांदेड - धनगर समाजाला आरक्षण दिल्या शिवाय आम्हाला पुन्हा मंत्रालयाची पायरी चढता येणार नाही, असे वक्तव्य महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे केले.

नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेत आयोजित धनगर मेळाव्यात त्या बोलत होत्या. राष्ट्रवादीने कागदावरचं बंधारे बांधले आणि कागदावरच विकास केल्याची घणाघाती टिका महिला व ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. 

काँग्रेस - राष्ट्रवादीने सत्तर वर्षे सत्ता उपभोगली मात्र पाणी प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. आमच्या सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श घेत जलयुक्त शिवार योजना राबविल्या

- पंकजा मुंडे

दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला आहे. आता धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी जोर धरत आहे. लवकरच लोकसभा, विधानसभेच्या निवडणूकांचे बिगूल वाजणार आहे, त्यामुळे भाजपला धनगर आरक्षणाचा मुद्दा भेडसावणार आहे. अशा परिस्थितीतच पंकजा मुंडेंच हे वक्तव्य त्यांच्यासह भाजपच्या नेत्यांसाठी डोकेदुखी
 तर ठरणार नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com