मराठा समाजाची दूत म्हणून काम करू - पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

परळी वैजनाथ  - मराठा समाजाचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी या समाजाची दूत म्हणून मुख्यमंत्री, पंतप्रधानांनाही भेटू. आपल्या प्रश्नांसाठी वाघांनो जीव देऊ नका लढा, असे भावनिक आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी येथे केले. 

मराठा क्रांती ठोक मोर्चा काढल्यानंतर येथे 18 जुलैपासून उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी आज दुपारी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, गेल्या तीन-चार वर्षांपासून हा समाज लढा देत आहे, याची जाणीव आहे. प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आरक्षणाची फाइल आपल्या टेबलवर असती तर कधीच प्रश्न सोडवला असता, मुख्यमंत्र्यांनीही निर्णय घेतला असता; परंतु हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर लवकर निकाल लागावा यासाठीही प्रयत्न करू. आपल्या भावना, प्रश्न, आक्रोश सरकार दरबारी मांडण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करू. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील त्रुटी दूर करण्यासाठीही प्रयत्न करू. आंदोलनांदरम्यान दोषी नसलेल्यांवर दाखल होत असलेले गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न असतील. प्रश्न सोडविण्यासाठी मराठा समाजाची दूत म्हणून यापुढे काम करू. 

Web Title: pankaja munde Maratha community question