'हॅट्स ऑफ' म्हणत पंकजा मुंडेनी शरद पवारांचं केलं कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.

प्रताप अवचार
Wednesday, 28 October 2020

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे मागील काही दिवसांपासून चर्चेत आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या दसरा मेऴाव्यातील त्यांचे भाषण कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चीले जात आहे. त्यातच पंकजा यांनी मंगळवारी रात्री केलेल्या एका ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. आपले राजकीय विरोधक शरद पवार यांच्या कार्याबद्दल त्यांनी पवारांना सलाम केला.  

औरंगाबाद : सध्या राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीच्या नेते शरद पवार यांचे नाव सर्वाधिक चर्चेले जात आहे. भाजपच्या रणनितीला कंटाळून बाहेर नाथाभाऊ यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीची खान्देशात ताकद वाढणार आहे. राजकीय पटलावरील या घडामोडी नुकताच निसरत नाही. तोच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेले एक ट्वीट सध्या सर्वाधिक चर्चीले जात आहे. पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत शरद पवारा यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे. मात्र ट्वीट नंतर येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडणार याबद्दल चर्चा केली जात आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोनाच्या संकट काळातही शरद पवारांकडून सातत्यानं भेटीगाठी आणि दौरे सुरूच आहेत. त्यांच्या या दौरे करण्याच्या आणि बैठका घेण्याच्या उत्साहाला भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सलाम केला आहे. पंकजा यांनी मंगळवारी रात्री ट्विट करत शरद पवारांच्या कामाविषयी आदर व्यक्त केला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठिशी मोठा जनाधार आहे. त्याचं मूळ त्यांचा दांडगा संपर्क आणि भेटीगाठीमध्ये आहे. करोनाच्या संकट काळातही शरद पवार यांचे दौरे आणि लोकांसोबतचा संपर्क थांबलेला नाही. शरद पवार यांच्या कामं करण्याचा उत्साह बघून पंकजा मुंडे यांनीही आदर व्यक्त करीत सलाम केला आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या ट्वीटमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटते. पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्यांविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे. अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला आहे.

राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंगळवारी (ता.२७ ) पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला. कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीला भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित होते. या बैठकीत मागण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कामाच्या झपाट्याबद्दलचं हे ट्विट केलं.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दसरा मेळाव्यातही उल्लेख 
दोन दिवसांपुर्वी बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यातही पंकजा मुंडे यांनी शरद पवारांचा उल्लेख केला. कारण धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये आहेत. शरद पवारांशी आपले कसे जवळचे संबंध आहेत. फोन केल्यावर ते कसे प्रश्न सोडवाला मदत करतात, असंही पंकजा मुंडेंनी दाखवण्याचा प्रयत्न केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde tweeted salute to Sharad Pawar