पंकजा मुंडे घोड्यावर स्वार (व्हिडिओ)

दत्ता देशमुख
गुरुवार, 11 जुलै 2019

राज्य सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण दिले. याबद्दल गुरुवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, तत्पुर्वी निघालेल्या फेरीत पंकजा मुंडे यांची घोड्यावरुन मिरवणुक काढण्यात आली.

परळी (जि. बीड) : राज्य सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण दिले. याबद्दल गुरुवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, तत्पुर्वी निघालेल्या फेरीत पंकजा मुंडे यांची घोड्यावरुन मिरवणुक काढण्यात आली.

पंकजा मुंडे यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन केले. त्यावेळी, घोड्यावरुन मिरवणूक काढली तेव्हा पंकजा मुंडे यांच्या हातात तलवारदेखिल पाहायला मिळाली.  मराठा आरक्षणावेळी आपण एक मराठा लाख मराठा ही घोषणा दिली. आता, एका मराठ्यानं एक लाख मतांचं नियोजन करायचंय, असे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

मराठा आरक्षण मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. विशेष म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालंय, हे मुंडेसाहेबांचा स्वप्न होतं. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळेल तरच ते टिकेल, असेही मुंडेसाहेबांनी म्हटल्याच पंकजा यांनी सांगितलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Mundes Rally in the joy of Maratha reservation