पनवेल- नांदेड विशेष गाडीच्या आणखी दोन फेऱ्या रद्द
पनवेल- नांदेड विशेष गाडीच्या आणखी दोन फेऱ्या रद्द

पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या दोन फेऱ्या रद्द

नांदेड : पनवेल- नांदेड विशेष गाडीच्या आणखी दोन फेऱ्या रद्द, तसेच कुर्ला- नांदेड-कुर्ला या गाडीच्याही दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने कळविले आहे.  

मध्य रेल्वेने कळवल्या नुसार सोलापूर विभाग, मध्य रेल्वे मध्ये सोलापूर ते वाडी विभागात वाडसिंगे ते भाळवणी रेल्वे स्थानका दरम्यान 35 किलोमीटर दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या पूर्ण झालेल्या रेल्वे पटरीला आपसात जोडण्याकरिता (इंटर लिंक) ता. 16 ऑगस्ट ते ता. 27 ऑगस्ट दरम्यान नॉन इंटर लॉक वर्किंगचे कार्य हाती घेण्यात आले आहे. यामुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. या मध्ये नांदेड- पनवेल- नांदेड एक्सप्रेस मुख्य आहे. सोलापूर विभागातून देशभरात धावणाऱ्या इतरही महत्वाच्या  रेल्वे गाड्या या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेड रेल्वे विभागातून धावणाऱ्या गाड्यांवर पुढील प्रमाणे परिणाम झाला आहे  –

पूर्णतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या..   
लोकमान्य टीळक टर्मिनस ते हजूर साहिब नांदेड ही गाडी ता. २८ आॅगस्ट रोजी पुर्णत: रद्द करण्यात आली आहे. तसेच हजुर साहिब नांदेड ते एलटीटी ही ता. २९ आॅगस्ट रोजी रद्द. 

नांदेड ते पनवेल ही ता. २४ आॅगस्ट रोजी धावणार नाही. त्यासोबतच पनवेल ते नांदेड ता. २५ आॅगस्ट रोजी पर्णत: रद्द केली आहे. तसेच नांदेड - कुर्ला एक्सप्रेसच्या दोन फेऱ्या रद्द केल्या आहेत. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल रेल्वे विभाग दिलगीर व्यक्त करीत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com