संविधान प्रत जाळल्याच्या निषेधार्थ परळी बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

परळी वैजनाथ : दिल्ली येथे भारतीय संविधानाची प्रत जाळून तो व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल केल्याच्या निषेधार्थ शनिवारी (ता.११) परळी बंद ठेवण्यात आली आहे. 

सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा बंद असून, विविध शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी (ता.10) रात्री 8 च्या सुमारास येथील शहर पोलिस ठाण्यात भारिप बहुजन महासंघाने यासंदर्भात निवेदन दिले होते. हा बंद दुपारी बारापर्यंत आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे. बंदचे आवाहन करीत कार्यकर्त्यांनी दुचाकी फेरीही काढली.

Web Title: The parali bandh due to the burning of the Constitution Copies