परभणीत पारा पुन्हा 45.6 अंशांवर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

तापमानाने पुन्हा कहर करीत रविवारी (ता. 2) जोरदार तडाखा दिला. शनिवारी (ता. 1) ढगाळ वातावरणामुळे तापमान दोन अंशांनी घसरले होते. रविवारी मात्र वातावरण पूर्वीसारखे तप्त होऊन परभणीत कमाल तापमान 45.06 अंश नोंदले गेले. 

परभणी - तापमानाने पुन्हा कहर करीत रविवारी (ता. 2) जोरदार तडाखा दिला. शनिवारी (ता. 1) ढगाळ वातावरणामुळे तापमान दोन अंशांनी घसरले होते. रविवारी मात्र वातावरण पूर्वीसारखे तप्त होऊन परभणीत कमाल तापमान 45.06 अंश नोंदले गेले. 

परभणी जिल्ह्यात यंदा तापमान सातत्याने वाढते आहे. मध्यंतरी पारा 47 अंशांवर गेला होता. उष्णतेच्या भंयकर लाटेत जिल्हा होरपळून निघाला आहे. एप्रिल आणि मे महिने तप्त उन्हाचे होते. जून महिन्यात तापमान कमी होईल, असे वाटत होते. मात्र, जूनची सुरवातही तापदायक वातावरणात झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parbhani @ 45.6

टॅग्स