esakal | परभणी : सोन्याचे आमिष दाखवून लाखो रुपये लुटणाऱ्या आरोपींना सेलू पोलिसांनी ठोकल्या बेड्या
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

४८ तासात पोलिसांनी चार आरोपी केले जेरबंद : पाच लाख पाच हजार रुपये हस्तगत

परभणी : सोन्याचे आमिष दाखवून लाखो रुपये लुटणाऱ्या आरोपींना सेलू पोलिसांनी ठोकल्या बेड्या

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : सोन्याचे आमिष दाखवून मुंबई येथील डॉक्टर महिलेचे लाखो रुपये लुटणाऱ्या चार आरोपींना सेलू पोलिसांनी अवघ्या ४८ तासात रविवारी (ता. २७) अटक केले. त्यांच्याकडून रोख पाच लाख पाच हजार रुपये जप्त केले. 

सेलू पोलिस ठाण्यात फिर्यादी डाॅ. उज्वला संदीप बोराडे (वय. ४०) रा. न्यू भांबरेकरनगर रुम नं. ५८ मालवाणी रा. मालाड पश्चीम मुंबई-९५ यांनी दिली.सुनिता नावाच्या महिला आरोपीने अर्ध्याभावाने सोने विकत देऊ असे म्हणून सतत मोबाईलवरुन संपर्कात राहून मुंबई येथून सेलू- देवगाव ( फाटा ) रस्त्यावरिल खानीचा मारोती मंदिराच्यामागे डिग्रस (बरसाले) शेत शिवारात (ता. २५) रोजी बोलावून घेऊन फसवणूक करुन आरोपी सुनिता पूर्ण नाव माहित नाही. व अज्ञात आरोपींनी मारहाण करुन फिर्यादी व साक्षिदार यांच्या जवळील रोख आठ लाख रुपये दोन मोबाईल जबरीने घेवून गेले होते.

हेही वाचा - परभणी : मुरुमाऐवजी काळ्या मातीचा वापर, तडे तर जाणारच ! परभणी- गंगाखेड रस्त्याचे वास्तव

आरोपीविरुध्द सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधिक्षक जयंत मीना, अप्पर पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याची तिव्रता लक्षात घेवून सेलू पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे एकूण चार पथके विविध भागात रवाना झाली. गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रीक पध्दतीने तपास केला असता. जिवाजी जवळा ( ता. सेलू ) येथे गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सेलू पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सरला गाडेकर हे आफल्या पथकासह सदर ठिकाणी रवाना झाले. तसेच इतर आरोपी हे शेळगाव ता. सोनपेठ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सेलू पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विजय रामोड व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक साईनाथ पुयड व त्यांचे कर्मचारी सदर ठिकाणी रवाना होवून जिवाजी जवळा ता. सेलू गेले. 

यावेळी येथून मुख्य आरोपी सुनिता भोसले हिला ताब्यात घेवून तिच्याकडून दोन लाख चाळीस हजार व आरोपी मंजिरी सुखवास शिंदे हिला ताब्यात घेवून तिच्याकडून दोन लाख पन्नास हजार असा एकूण चार लाख नव्वद हजार रूपये रोख गुन्ह्यातील गेलेला माल जप्त केला. यातील आरोपी श्रीनाथ भोसले व शैलेश शिंदे या दोघांना शेळगाव ता. सोनपेठ येथुन ताब्यात घेवून त्यांच्याकडून पंधरा हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक जयंत मीना, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मूम्मका सुदर्शन व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्य  पोलिस निरिक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सेलू पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विजय रामोड, तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक सरला गाडेकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व सेलू पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image