esakal | परभणी ब्रेकींग : सोमवारी सकाळीच आढळले सात नवे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्ह्यात एकूण रुग्णांचा आकडा आता दिडशेचा टप्पा गाठत आहे. सोमवारी सकाळी सापडलेल्या रुग्णांमध्ये परभणीतील सरफराजनगरमध्ये दोन, झरी (ता. परभणी) गावात दोन व गंगाखेड तालुक्यात दोन तर मानवत शहरात एक रुग्ण आढळून आला आहे.

परभणी ब्रेकींग : सोमवारी सकाळीच आढळले सात नवे रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : जिल्ह्यात कोरोना मीटर वेगाने सुरुच असून सोमवारी (ता. सहा) सकाळी आलेल्या अहवालात नव्या सात रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांचा आकडा आता दिडशेचा टप्पा गाठत आहे. सोमवारी सकाळी सापडलेल्या रुग्णांमध्ये परभणीतील सरफराजनगरमध्ये दोन, झरी (ता. परभणी) गावात दोन व गंगाखेड तालुक्यात दोन तर मानवत शहरात एक रुग्ण आढळून आला आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणुची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा आता दररोज वाढत जात आहे. अवघ्या आठवडा भरात कोरोना बाधित रुग्णांनी दिडशेचा टप्पा गाठला आहे. परभणी शहरासह इतर मोठ्या गावात व तालुक्यातही रुग्ण संख्या वाढत जात आहे. गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संचारबंदी लागू केली आहे. असे असतांनाही गेल्या तीन दिवसापासून रुग्णांची संख्या झापाट्याने वाढत असल्याचे प्राप्त अहवालावरून स्पष्ट होत आहे. परभणी जिल्ह्यात रविवारी (ता.पाच) केवळ एक रुग्ण आढळला होता. त्या आधी शनिवारी तब्बल १० रुग्णांचे अहवाल पॉझीटिव्ह आले होते. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोघेजण कोरोनाबाधित आढळून आले

सोमवारी (ता.सहा) परभणी शहरातील सरफराजनगर मधील दोन व्यक्तीचे थ्रोट स्वॅब पॉझीटीव्ह आले आहेत. तर झरी (ता.परभणी) या गावातील दोघेजण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. गंगाखेड शहरातील एक व तालुक्यातील एक तसेच मानवत शहरातही एका व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

गंगाखेड तालुक्यातील दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह

गंगाखेड : गंगाखेड तालुक्यात कोरोनाच्या शिरकावा नंतर जून महिन्यात गंगाखेड तालुका हा कोरोनामुक्त झाला होता. स्थलांतरितांमुळे पुन्हा गंगाखेड तालुक्यात दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. ता. 26 मे पर्यंत 17 कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. या 17 जणांना काॅरंटाईन करून पुन्हा त्यांची तपासणी केली असता तालुक्यातील कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण हे 12 जून रोजी निगेटिव्ह आल्यामुळे गंगाखेड तालुका हा कोरोनामुक्त झाला होता. परंतु स्थलांतरितांचे प्रमाण वाढत असून या मध्येच गंगाखेड तालुक्यातील शेलमोहा येथील चार जणांचे व शहरातील पूजा मंगल कार्यालय परिसरातील एका महिलेचे  स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले असता यापैकी दोन महिलांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

मानवत शहरात एक पॉझिटीव्ह

मानवत शहरातील पोलिस वसाहत परिसरातील एक व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ही सापडली आहे. त्यामुळे हा परिसर निर्जतुकीकरणाचे काम सोमवारी सकाळी हाती घेण्यात आले होते.