esakal | Parbhani Breaking : मुंबई येथून आलेले तीन जण कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आरोग्य विभागाकडून पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना कोरोना वार्डात दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचार सुरु आहेत. त्या तिघांचीही तब्येत स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.

Parbhani Breaking : मुंबई येथून आलेले तीन जण कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी :  मुंबईहून मूळगावी शेवडी (ता.जिंतूर) येथे परतलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परभणी जिल्हा प्रशासनासह नागरिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेवडी (ता.जिंतूर) येथील रहिवाशी मुंबई येथील ऑर्थर रोड जेलमध्ये गार्ड म्हणून पोलीस कर्मचारी कार्यरत होता. तो जिंतूर तालुक्यातील शेवडी या गावचा रहिवासी आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आपल्या परिवाराला घेऊन गावाकडे निघाला. जिंतूरला आल्यानंतर त्याने आपली व पत्नी आणि दोन मुलांची तपासणी करून घेतली होती. तपासणी अहवाल येईपर्यंत त्या कुटुंबाला डॉक्टरांनी कोरंटाईन केले होते. 

हेही वाचा - Good news- कोरोना चाचणी आता परभणीतच होणार...

मुंबईहून आलेल्या या कुटुंबियांपैकी पोलिस कर्मचाऱ्यांचा अहवाल गुरुवारी (ता.१४ मे) रात्री निगेटीव्ह आला. परन्तु त्याची पत्नी व दोन मुले हे पॉझिटिव्ह निघाले आहेत.  आरोग्य विभागाकडून पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना कोरोना वार्डात दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचार सुरु आहेत. त्या तिघांचीही तब्येत स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.

कोरोना विषाणूची चाचणी आता परभणीतच
कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही, याची तपासणी आता परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात केली जाणार आहे. दीड ते दोन महिन्यांपासून येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात किंवा तालुका रुग्णालयातून संशयित रुग्णांचे स्वॅब घेतले जात होते. येथून ते पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेकडे खास वाहनाद्वारे पाठविल्या जात होते. मात्र, दोन ते तीन दिवस त्या स्वॅबच्या अहवालाची प्रतीक्षा करावी लागत होती.