esakal | परभणी : सेलू बाजार समितीची यंदाही विक्रमी सात लाख क्विंटल कापुस खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या हंगामात येथिल कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या कापूस यार्ड परिसरात सीसीआय आणि खाजगी व्यापार्‍यांकडून तब्बल सात लाख क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

परभणी : सेलू बाजार समितीची यंदाही विक्रमी सात लाख क्विंटल कापुस खरेदी

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : यावर्षी सेलू परिसरात पाऊस चांगला झाल्याने कापसाचे पिकही चांगल्या प्रमाणात आले.त्यामुळे  या हंगामात येथिल कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या कापूस यार्ड परिसरात सीसीआय आणि खाजगी व्यापार्‍यांकडून तब्बल सात लाख क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

सेलूत दरवर्षी विक्रमी कापूस खरेदी होत आहे.दरवर्षी सेलू तालुक्यात आणि परिसरात सर्वाधिक कापासाची लागवड केली जाते.परिसरातील शेतकरी कापसाकडे नगदी पीक म्हणून पाहतात.परिणामी खरीप हंगामात कापसाच्या उत्पादनावर शेतकर्‍यांचे आर्थिक मदार आहे. त्यामुळे खत,बियाणे आणि औषधीची देखील मोठ्या प्रमाणावर विक्री होते. यावर्षी सुरूवातीच्या काळात सीसीआय कडून कापूस खरेदी केंद्र सुरू नसल्याने किरकोळ बाजारात शेतकर्‍यांच्या कापसाची कवडीमोल भावाने खरेदी केली जात होती. पंरतु (ता. १९) नोव्हेंबर पासून शहरासह वालूर, देवगाव फाटा येथील एकूण अकरा कापूस जिनिंगवर सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू झाली होती. सीसीआयकडून समाधान कारक दर मिळत असल्याने सेलू येथे परजिल्हातून कापूस विक्रीसाठी शेतकरी आले. त्या काळात आठ-आठ दिवस कापसाचे माप होत नव्हते.

हेही वाचाजिंतूरमध्ये वर्षभरात पावणेदोन हजार नागरिकांना कोरोनाची लागण; चाळीस नागरिकांना प्राणास मुकावे लागले

येथिल बाजार समितीच्या वतिने योग्य नियोजन लावून आलेला कापूस खरेदी करण्यात आला.गर्दी झाल्याने बाजार समीतीचा सात एक्करची जागा अपुरी पडत गेली. परिणामी तहसील कार्यालया पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.(ता.१२) फेब्रुवारी रोजी सीसीआयकडून कापूस खरेदी बंद करण्यात आली. त्यानंतर खाजगी बाजार पेठेत अचानक कापसाच्या भावात वाढ झाली होती. पंरतु अगोदर बहुतांशी गरजू शेतकर्‍यांनी कापसाची विक्री केली.त्यामुळे साठवून ठेवलेल्या मोठ्या शेतकर्‍यांना चांगला भाव मिळाला.यंदाच्या कापूस हंगामात सीसीआय कडून तब्बल सहा लाख १० क्विंटल तर खाजगी व्यापार्‍यांकडून ८० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात कापूस खरेदीत अव्वल असल्याची माहिती आहे.गेल्यावर्षी सीसीआयकडून लाॅकडाऊन असल्याने जून महिन्या पर्यंत कापुसाची खरेदी सुरू होती. त्या हंगामात तब्बल सात लाख क्विंटल विक्रमी कापूस खरेदी झाली होती. यंदाही गतवर्षी प्रमाणेच कापूस खरेदी झाली आहे. 


शेतकर्‍यांची विश्वासहार्यता...

येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीकडुन शेतकर्‍यांच्या कापसाला योग्य भाव व शेतकर्‍यांना चांगल्या सुविधा देण्यात येतात. त्यामुळेच येथिल बाजार समितीने शेतकर्‍यांची विश्वासहार्यता कमावलेली आहे.या ठिकाणी बीड,जालना व बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आपला कापुस विक्रीसाठी आणतात. यंदाच्या हंगामात बाजार समितीला मिळालेल्या उत्पन्नातुन शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी लवकरच अॅब्युंलन्स घेणार असल्याची प्रतिक्रिया बाजार समितीचे मुख्यप्रशासक विनायक पावडे यांनी 'सकाळ' शी बोलतांना दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image