युमना नदीत परभणीचे भाविक बुडाले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

परभणी - श्री क्षेत्र प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे अस्थीविसर्जनासाठी गेलेल्या परभणी व नांदेड जिल्हयातील तीन महिला बुडून मरण पावल्याची घटना घडली आहे. पाच यात्री बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

परभणी जिल्ह्यातील दैठणा, माखणी व नांदेड जिल्ह्यातील कोलंबी येथील हे 14 जण प्रयागराज येथे अस्थिविसर्जनासाठी गेले होते. हे सर्व एकमेकांचे नातेवाईक होते. सोमवारी (ता.10) रात्री पावणे सात वाजता ते सर्व एका नावे मध्ये बसून येत असतांना नावेला अचानक छिद्र पडले. त्यामुळे आरडा-ओरडा झाला. नाविकासह काही जणांनी पाण्यात उड्या मारून नदी बाहेर आले. परंतु, नाव उलटल्याने तीन महिला बडून मरण पावल्याची माहिती आहे.

Web Title: Parbhani devotees drowned in the river Yamuna