esakal | परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटली 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परभणी जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना विषाणुचा संसर्ग सहा हजार २३१ रुग्णांना झाला आहे. त्यापैकी पाच हजार ६३२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. बाधितांपैकी २५५ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात २० नवे कोरोनाबाधित आढळले आहेत तर ३८ जण कोरोनावर मात करून सुखरुप घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये ३२४ जणांवर उपचार सुरु आहेत.

परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटली 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी - परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली आहे. सध्या जिल्ह्यात केवळ ३२४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, शनिवारी दिवसभरात एक कोरोनाबाधितांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या आता २५५ झाली आहे. 

परभणी जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना विषाणुचा संसर्ग सहा हजार २३१ रुग्णांना झाला आहे. त्यापैकी पाच हजार ६३२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. बाधितांपैकी २५५ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात २० नवे कोरोनाबाधित आढळले आहेत तर ३८ जण कोरोनावर मात करून सुखरुप घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये ३२४ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. 

हेही वाचा - नांदेड : नवरात्रोत्सवात ना दांडीया, ना सार्वजनिक कार्यक्रम, भक्तात नाराजगी

पुर्णेत ऑक्सिजन व एक्स रेची सुविधा द्यावी  
परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील कोविड केअर सेंटरमध्ये आॅक्सीजन बेडची व एक्स रे काढण्याची व्यवस्था करा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन केली आहे. पूर्णा तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयातंर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पांगरा रोड येथे ८० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. येथे उपचार घेण्यासाठी दररोज रुग्ण दाखल होत आहेत. त्यापैकी काही रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत. 

जिल्हाप्रमुख कदम यांनी दिले पत्र
पूर्णा शहर व तालुक्यात कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथील कोविड केअर सेंटरमध्ये आॅक्सीजनची व्यवस्था नसल्याने ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना परभणी, नांदेड येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले जाते आहे. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे. एखाद्या रुग्णास तत्काळ ऑक्सिजनची गरज निर्माण झाल्यास त्या अभावी एखाद्याचा प्राण जावू शकतो. तसेच कोरोनाची लागण किती प्रमाणात झाली हे तपासण्यासाठी एक्स रे मशीनची तत्काळ गरज आहे. त्यामुळे यात लक्ष घालून या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुंबई येथे भेट घेऊन केली आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - नवरात्रोत्सवाला सुरुवात, तरीही नांदेडच्या बाजारपेठेत शुकशुकाटच

परभणी कोरोना मीटर 
एकूण पॉझिटीव्ह रुग्ण ः सहा हजार २३१ 
एकूण बरे रुग्ण ः पाच हजार ६५२ 
आजपर्यतचे मृत्यू ः २५५ 
आज शनिवारी उपचार घेणारे रुग्ण ः ३२४ 
आज शनिवारी पॉझिटिव्ह रुग्ण ः २० 
आज शनिवारी बरे रुग्ण ः ३८ 
आज शनिवारी मृत्यू ः एक 

 

loading image
go to top