परभणी : घरगुती वादातून पत्नीने केला पतीचा दगडाने ठेचुन खून

गणेश पांडे | Wednesday, 18 November 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिस्ट्री शीटर गुन्हेगार अलीम काजी याच्यावर मोबाइल चोरीसह हाणामारी, छोट्या मोठ्या चोरीसह अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल होते. मागील दोन वर्ष तो परभणीतुन गायब होता.

परभणी : घरगुती वादातून एका व्यक्तीच्या त्याच्या पत्नीसह सासूने दगडा ने ठेचून जीवे मारल्याची घटना मंगळवारी (ता. १७) रात्री उशिरा शहरातील जमजम कॉलनीत उघडकीस आली. दरम्यान, मयत व्यक्तीवर विविध गुन्हे दाखल असून तो हिस्ट्री शीटर असल्याची माहिती कोतवाली पोलिसांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिस्ट्री शीटर गुन्हेगार अलीम काजी याच्यावर मोबाइल चोरीसह हाणामारी, छोट्या मोठ्या चोरीसह अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल होते. मागील दोन वर्ष तो परभणीतुन गायब होता. दोन-तीन दिवसांपूर्वी परभणीत आला होता. मंगळवारी (ता. १७) दारू पिऊन तो पत्नीसोबत वाद घालू लागला. आपल्या सोबत चल म्हणत धींगाना घालत होता. मंगळवारी भांडणाचे पर्यवसान मोठ्या वादात झाले. याच रागातुन त्याच्या पत्नीसह सासुने  दगड, विटानी ठेचुन त्याला जागीच ठार केले अशी माहिती कोतवाली पोलिसांनी दिली.  घटनेची माहिती समजताच कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले.  

हेही वाचा - हिंगोली : २२ लाखचे गांजाची झाडे जप्त- एसपी कलासागर यांची धाडशी कारवाई

अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल बहात्तरे हे करत आहेत.

सुनसान भागात मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून

मंगळवारी रात्री जमजम कॉलनीतील एका सुनसान भागात अलीम काजी याचा मृतदेह पडून होता. रात्री उशिरा कोतवाली पोलिसांचे पथक या ठिकाणी पोहचले होते. त्याच रात्री मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. रात्री हा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आला.

अलीम काजी हिस्ट्री सीटर

मयत अलीम काजी हा हिस्ट्री सीटर होता. त्याच्या विरोधात अनेक गुन्ह्याची नोंद होती. मोबाईल चोरणे, हाणामारी करणे, धमकाने असे एक ना अनेक गुन्हे अलीम काजी याच्या नावावर आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे