परभणी : शिंदे समर्थनार्थ लावलेले पोस्टर परभणीत फाडले

शिंदेंसह ३९ बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
Parbhani shivsainik against shinde group mla
Parbhani shivsainik against shinde group mla

परभणी : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ येथील वसमत मार्गावर लावलेले पोस्टर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी फाडले. शिंदेंसह ३९ बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

परभणीतील वसमत मार्गावर एका ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मोठे पोस्टर लावल्याची माहिती मिळताच युवा सेना पदाधिकाऱ्यांनी पोस्टरला काळे फासून ते फाडले. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख अर्जुन सामाले, प्रदीप भालेराव, ऋषिकेश सावंत, तुषार चोभरकर, ओंकार शहाणे, गोविंद माने, यशराज ओझा व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com