esakal | परभणी : सेलूत शेतकर्‍यांचा कापूस खाजगी व्यापारी घेतायेत बेभाव.
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

याच परिस्थितीचा फायदा घेऊन नव्याने कापूस खरेदीत उतरलले तालुक्यातील खाजगी व्यापरी रांगेत असलेल्या शेतकर्‍यांचा बेभाव कापूस खरेदी करित आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या गारठा शेतकर्‍यांसाठी जिवघेणाच ठरत आहे.

परभणी : सेलूत शेतकर्‍यांचा कापूस खाजगी व्यापारी घेतायेत बेभाव.

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : तालुक्यातील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर तालुक्यासह बाहेरच्या जिल्ह्यातून शेकडो शेतकरी कापूस विक्री करण्यासाठी आपल्या वाहनांसह आठ ते आठ दिवस रांगेत उभे राहात आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेऊन नव्याने कापूस खरेदीत उतरलले तालुक्यातील खाजगी व्यापरी रांगेत असलेल्या शेतकर्‍यांचा बेभाव कापूस खरेदी करित आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या गारठा शेतकर्‍यांसाठी जिवघेणाच ठरत आहे.

तालूक्यात सीसीआयकडून ( ता. १९ ) नोव्हेंबर पासून शहरासह वालूर, देवगाव (फाटा ) येथील एकूण नऊ कापुस जिनिंगवर खरेदी केली जात आहे. किरकोळ बाजारात व्यापारी कापसाची कवडीमोल भावाने खरेदी करत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी सीसीआयकडे कापूस विक्री करित आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाथरी रस्त्यावरिल कापूस यार्ड परिसरात वाहनांची एकच गर्दी झाली आहे. त्यातच सीसीआयच्या खरेदी केंद्रावरील जिनिंगवर कापूस साठविण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण देऊन मागील आठवड्यात पाच दिवस कापूस खरेदी बंद केली होती. परिणामी पुन्हा वाहनांच्या संख्येत वाढ झाली. त्यातच प्रत्येक शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस सीसीआयकडून कापुस खरेदी केली जात नाही.

हेही वाचा - नांदेड : बनावट कागदपत्रांद्वारे फायनान्स कंपनीला १३ लाखाचा गंडा -

त्यामुळे कापसाच्या वाहनांची अधिकच कोंडी होत आहे. सेलू तालुक्यासह इतर जिल्ह्यातून सेलूत कापूस विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येत असल्याने मोठी गर्दी झाली आहे. सीसीआयकडून दररोज एक हजार २०० हजार ते एक हजार ३०० हजार क्विंटल कापसाची खरेदी केली जात आहे. खरेदी केलेला कापूस विविध जिनिंगवर पाठवला जातो. खरेदी केलेला कापसाची जिनिंग आणि विक्रीसाठी वाढलेला लोंढा याचा ताळमेळ बसत नसल्याने आठ- आठ दिवस कडाक्याच्या थंडीत शेतकरी वाहनांसह कापूस यार्डात ताटकळत आहेत. आगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना हेरून शहरातील  काही भांडवलदार व्यक्तींनी कापूस खरेदीत उडी घेतली आहे. शेतकर्‍यांकडून पाच हजार रुपये प्रतिक्विंटलने कापूस खरेदी करून तेच कापूस सीसीआयला पाच हजार ७२५ रूपये प्रतिक्विंटलने विक्री करून दररोज लाखोंचा नफा शहरातील भांडवलदार कमवत आहे.त्यामूळे आगोदरच मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी पुन्हा अडचणीत सापडत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image