कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड देणारे परभणी राज्यातील पहिलेच आरटीओ कार्यालय

गणेश पांडे 
Thursday, 7 January 2021

परभणीच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात गुरुवारपासून या ड्रेसकोडमध्ये कर्मचारी गुरुवारपासून दिसत आहेत. या वेळी वरिष्ठ अधिकारी शैलेशकुमार कामत व श्रीकृष्ण नखाते उपस्थित होते. 

परभणी ः येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना गुरुवार (ता.सात) ड्रेसकोड देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यामध्ये आत्मविश्वास वाढून जनतेची कामे सुकर होण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे असे कार्यालय प्रमुखांच्यावतीने सांगण्यात आले आहे. 

परभणी येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात आता पर्यत युनिफॉर्म नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये व कार्यालयात येणाऱ्या अभ्यंगतामध्ये फारसा फरक दिसत नसे. परिणामी कामाची गती म्हणावी त्या पध्दतीने वाढत नव्हती. 

हेही वाचा - Gram Panchayat Election: अर्धापुरात 45 महिला उमेदवार बिनविरोध, सहा ग्रामपंचायतीसह 67 बिनविरोध -

नखाते यांनी घेतला ड्रेसकोडचा निर्णय 
काही दिवसापूर्वी परिवहन खात्यातील कर्मचाऱ्या ड्रेसकोड असावा असा अध्यादेश राज्यशासनाने काढला होता. परंतू त्यावर फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही. परंतू, परभणीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी मात्र परभणीच्या कार्यालयास शिस्त लावण्यासाठी व कामातील गतीमानता वाढावी यासाठी ड्रेसकोडचा निर्णय घेतला. 

कार्यालयात दहा कर्मचारी 
सध्या परभणीच्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दहा कर्मचारी आहेत. त्या सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड देण्यात आला आहे. विशेष म्हणजे परभणीचे कार्यालय हा निर्णय घेवून त्याची तातडीने अमलबजावणी करणारे राज्यातील पहिले कार्यालय ठरले आहे. 

हेही वाचा - जिल्ह्यात पर्यावरण विभागाची संमती मिळाली नसल्याने रेती घाटांचा लिलाव गतवर्षी होऊ शकला नाही

प्रशासनाची कार्यक्षमता व गतिमानता वाढावी यासाठी हा निर्णय
हा उपक्रम कर्मचारी यांच्यात एकोपा तसेच आत्मविश्वास वाढावा, अभ्यागतांना कार्यालयीन कर्मचारी लगेच ओळखू यावा. प्रशासनाची कार्यक्षमता व गतिमानता वाढावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 
- श्रीकृष्ण नखाते, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani is the first RTO office in the state to issue dress code to its employees, Parbhani News