परभणी : ग्रामपंचायतीच्या निवडणूकांची रणधूमाळी सुरु- सेलू तालूक्यातील ६७ ग्रामपंचायत निवडणूका

विलास शिंदे
Saturday, 2 January 2021

तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकित  ३१ ग्रामपंचायतीवर महिला राज येणार असून ६७ ग्रामपंचायतीसाठी २०५ वार्डातून ५१९ सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी ( ता.१५ ) जानेवारr- २०२१ रोजी मतदान होणार आहे.

सेलू (जिल्हा परभणी ) : तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या एक हजार ३१३ अर्जापैकी छाननीत बारा अर्ज अवैध ठरले.तर एक हजार २०१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यामूळे गावागावात ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी रणधूमाळी सुरू झाल्याचे चित्र पाहावयास दिसत आहे.

तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकित  ३१ ग्रामपंचायतीवर महिला राज येणार असून ६७ ग्रामपंचायतीसाठी २०५ वार्डातून ५१९ सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी ( ता.१५ ) जानेवारी— २०२१ रोजी मतदान होणार आहे.

हेही वाचानांदेड : मुदखेड तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीसाठी १, १०३ उमेदवारी अर्ज वैध -

आवघ्या बारा दिवसावर येवून ठेपलेल्या मतदानासाठी गावपातळीवरिल एक—एक मतांसाठी उमेदवारांची चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे.तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी मतदारसंघाच्या आमदार मेघना साकोरे—बोर्डीकर व माजी आमदार विजय भांबळे या दोन्ही पक्षांसह अनेक गावात उच्चशिक्षित तरूणांनी तिसरा पॅनल उभा केल्याने काही ठिकाणी दूरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत.त्यामूळे गाव पातळीवरिल पूठारी या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी मतदारांना ही निवडणूक आर या पार ची होणार असे बोलून दाखवित आहेत.त्यामूळे मतदारांनाही नेमके कोणाला मतदान करावे व कोणाला टाळावे जेकी गावपातळीवर रोजच एकमेकांची भेट होते.गप्पा होतात,केंव्हा केंव्हा जेवणही सोबतच होते,सुख दू:खातही एकमेकांची साथ मिळते.अशा गावातीलच भावकी सोबत दूश्मनी या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमूळे होते की?काय असा प्रश्न गावातील सर्वसामान्य मतदारांना भेडसावत आहे.

मतदारांसाठी गाड्यांची व्यवस्था...

परजिल्ह्यात आपल्या कुटूंबाचे पोट भरण्यासाठी कामानिमित्त गेलेल्या गावातील मतदारांना त्यांचे मत आपल्याच उमेदवाराला पडावे यासाठी पॅनल प्रमुखांनी त्यांचा शोध घेवून त्यांना परत गावी आणण्यासाठी चारचाकी व्यवस्था केली असून त्यांच्यासाठी गाड्याही रवाना झाल्या आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Gram Panchayat elections are in full swing - 67 Gram Panchayat elections in Selu taluka parbhani news