esakal | परभणीला धक्का : गंगाखेड शहरात २४ तासात २० कोरोनाग्रस्त
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या व्यापाराच्या परिवारातील 60 वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह प्राप्त झाल्यानंतर संपर्कातील 108 व्यक्तींची रॅपिड अँटीजेन्ट् टेस्ट केली असता यापैकी 20 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह

परभणीला धक्का : गंगाखेड शहरात २४ तासात २० कोरोनाग्रस्त

sakal_logo
By
प्रा. अंकुश वाघमारे

गंगाखेड (जिल्हा परभणी) : शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांने लग्न सोहळ्या प्रीत्यर्थ स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. स्वागत समारंभाच्या कार्यक्रमास राजकीय, प्रशासकीय अधिकारी, प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती. या व्यापाराच्या परिवारातील 60 वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह प्राप्त झाल्यानंतर संपर्कातील 108 व्यक्तींची रॅपिड अँटीजेन्ट् टेस्ट केली असता यापैकी 20 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह प्राप्त झाल्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या 41 वर पोहोचल्यामुळे गंगाखेड शहरात कोरोनाचा कहर झाला आहे.

गंगाखेड तालुक्यातील सेलमोहा येथे मुंबई येथून आलेली महिला व शहरातील पूजा मंगल कार्यालय परिसरातील महिला महिलांचे रिपोर्ट (ता. 6) जुलै सोमवार रोजी कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर प्रशासनास खडबडून जाग आली. लग्न सोहळा निमित्त स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन कोरोनाग्रस्त महिलेच्या परिवाराने केले होते. परभणी जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलून सदरील कार्यक्रमास राजकीय, प्रशासनातील अधिकारी,प्रतिष्ठित नागरिकांनी हजेरी लावली होती. या महिलाच्या  संपर्कातील व्यक्तींना काॅरंटाईन करून यांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले. 

हेही वाचाVideo - लॉकडाउनचा काळ लोकसंख्या वाढीस कारणीभूत ठरू नये, कोण म्हणाले... वाचा...

गंगाखेड तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 41 वर

असता (ता. 11) जुलै रोजी दुपारपर्यंत नऊ कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी गंगाखेड शहरात भेट देऊन कोरोनाग्रस्थाच्या संपर्कातील 108 व्यक्तींची रॅपिड अँटीजेन्ट् टेस्ट केली असता (ता. 11) जुलै च्या रात्रीपर्यंत 19 व (ता.12) जुलै च्या पहाटे एक व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळून आले. यामुळे गंगाखेड तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 41 वर पोहोचली असल्यामुळे तालुक्याचे चिंता वाढली आहे.

'त्या' व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या त्या महिलेच्या कुटुंबातील स्वागत समारंभास लोकप्रतिनिधीसह प्रशासनातील अधिकारी पञकार व व्यापाऱ्यांनी लावलेल्या उपस्थिती मुळे प्रत्येकात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्वागत समारंभाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना (ता. 11) जुलै शनिवार रोजी घडली. सदरील समारंभ विना परवानगी झाला    असून यातुनच शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाल्याने प्रशासन जाग आली. शनिवार दुपारी दोन वाजता आलेल्या अहवाला नुसार गंगाखेड तालुक्याची संख्या २१ झाली होती. त्यात भर पडून ही संख्या आता ४१ वर गेली आहे. लग्न समारंभा निमित्त स्वागत समारंभाचे आयोजन करणारे व्यापारी राधेशाम भंडारी यांच्यावर पोलिस स्टेशन येथे तलाठी चंद्रकांत साळवे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top