परभणी : साडेसहा कोटींचा मुद्देमाल जप्त

श्रेणिक लोढा यांची महातपुरी येथील वाळू धक्क्यावर धाडसी कारवाई
Parbhani illegal sand Property confiscated 6 crore 50 lakh
Parbhani illegal sand Property confiscated 6 crore 50 lakhsakal

गंगाखेड : गौण खनिज उत्खननाच्या नियमावलींचे राजरोसपणे उल्लंघन होत असताना देखील महसूल प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे. परंतु, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी पोलिस प्रशासन समोर येत आहे. तालुक्यातील महातपुरी वाळू धक्क्यावर सहायक पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी धाडसी कारवाई करत ६ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. रेती घाटावरून वाळू उपसा करण्यासाठी शासनाने नियमावली तयार केली आहे. परंतु, परभणी जिल्ह्यातील महसूल प्रशासन रेती माफियांकडून गौण खनिज उत्खननाच्या नियमावलींचे उल्लंघन होत असताना देखील कारवाई करत नाही हे सर्वश्रुत आहे. परंतु, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून गंगाखेड येथे येथील सहायक पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी आपला मोर्चा वाळू माफियांकडे वळवला आहे.

त्यांनी मंगळवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान सोनपेठ पोलिस हद्दीतील व गंगाखेड तालुक्यातील महातपूरी रेती घाटावर प्रत्यक्ष जात रेती घाटावरून २२ वाळू उडविणारे इंजिन, १० हायवा, ४ जेसीबी तसेच महातपुरी शिवारातील सर्वे नंबर १५०/३ येथे जवळपास ६ हजार ब्रास अवैधरीत्या रेतीचा साठा असा एकूण ६ कोटी ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. श्रेणिक लोढा यांच्या धाडसी कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

महसूलचे दुर्लक्ष

गोदापात्रात गौण खनिज उत्खननाच्या नियमावलींचे वाळू माफिया उल्लंघन करत असताना देखील महसूल प्रशासनाकडून कार्यवाही का होत नाही? हे मात्र गौडबंगाल गुलदस्त्यातच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com