परभणी जिल्ह्यात आढळले १६४ दूषित पाणी नमुने

water pollution
water pollution

परभणी - ग्रामीण भागात सध्या पाणीटंचाई असताना दूषित पाणवठ्यांची संख्या वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या ९७८ पाणी नमुन्यांपैकी १६४ नमुने दूषित आढळले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दर महिन्याला पाण्याची तपासणी केली जाते. त्यात ही बाब उघड झाली आहे.

उन्हाळ्यामुळे पाणीपातळी खोल गेलेली आहे. त्यामुळे ग्रामस्थ मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणत आहेत. ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता सर्वाधिक आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजना पाण्या अभावी बहुतांश ठिकाणी बंद पडल्या आहेत. गावातील हातपंप, सभोवतालच्या विहिरी देखील कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी गावपरिसरातील विहिरी, एखादा हातपंप अशा ठिकाणाहून तर काही थेट शेतातून पाणी आणत आहेत. त्यामुळे शुद्ध आणि दूषित पाणी याचा फरक न करता मिळेल ते पाणी वापरले जात आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाण्याची तपासणी दर महिन्याला केली जाते. जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेत त्याची तपासणी होऊन आरोग्य विभागाला अहवाल देण्यात येतो. एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील ९७८ ठिकाणाचे पाणी नमुने घेतले होते. त्यात १६४ नमुने दूषित आढळले आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आढळलेले दूषित नमुने याप्रमाणे
परभणी तालुक्यातील जांब २, झरी-१२, पिंगळी-५, पेडगाव-४, दैठणा-६, पूर्णामधील ताडकळस-५, कंठेश्वर-२, कावलगाव-३, धानोराकाळे-२, पालमधील रावराजूर-४, चाटोरी-८, गंगाखेडमधील महातपुरी-२, कोद्री-१५, पिंपळदरी-३, राणीसावरगाव-७, धारासुर ११, सोनपेठ-७, पाथरीमधील वाघाळा -११, बाभुळगाव-१०, मानवतमधील रामपुरी-३, कोल्हा-३, सेलूतील देवळगावगात-१३,वालूर-८, जिंतूरमधील आसेगाव-७, येलदरी-४, आडगाव बाजार-७, चारठाणा-६, वझरहंडी-५

फेब्रुवारीत सर्वात कमी दूषित नमुने
जानेवारीमध्ये ९४४ पाणी नमुन्यापैकी १४५ नमुने दूषित आढळले होते. फेब्रुवारी महिन्यातील ९६६ नमुन्यांपैकी ११७, मार्च मधील ९६६ पैकी १५८ पाणी नमुने दूषित आढळले होते. जेथे दूषित पाणी आढळले तेथील पाणी पिण्यास बंदी घातली जाते. तसेच गावातील सर्व पाणवठ्यात ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com