स्थानिक गुन्हे शाखेकडून गुट्टेंची चार तास चौकशी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

परभणी - सभासद शेतकऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे, पाच राष्ट्रीयीकृत व एका खासगी बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले गंगाखेड शुगर अँड एनर्जी या साखर कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांची शुक्रवारी परभणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून चार तास चौकशी झाली.

गंगाखेड तालुक्‍यातील विजयनगर माखणी येथील गंगाखेड शुगर कारखान्याचे सभासद असणाऱ्या सुमारे दहा हजार शेतकऱ्यांच्या नावावर बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बॅंकांतून 328 कोटी रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याची फिर्याद गिरीधर सोळंके या शेतकऱ्याने बुधवारी (ता.5) गंगाखेड पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून कारखान्याचे अध्यक्ष डॉ. गुट्टे यांच्यासह संचालक मंडळ, आर्थिक व्यवहार सांभाळणारे; तसेच पीक कर्जाची कामे हाताळणारे शेतकी अधिकारी, कर्मचारी, बनावट शिक्के व कागदपत्र तयार करणारे कर्मचारी, खासगी व्यक्ती, आंध्र बॅंक, युको बॅंक, युनायटेड बॅंक ऑफ इंडिया, सिंडिकेट बॅंक, रत्नाकर बॅंकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

आर्थिक गुन्ह्यात हे प्रकरण येत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने रत्नाकर गुट्टे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान गुट्टे पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर झाले. त्यांची सलग चार तास चौकशी झाली. दरम्यान, याचप्रकरणी पोलिसांचे एक पथक दिवसभर "गंगाखेड शुगर'वर बसून होते. तेथे येणाऱ्या शेतकऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय हिबारे यांनी दिली.

Web Title: parbhani marathwada news Investigation of four hours of clutches from local crime branch