महाराष्ट्र सिंचन परिषदेचे आज परभणीत उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

परभणी - येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळ व सिंचन सहयोग यांच्या वतीने 18व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचे उद्‌घाटन शनिवारी (ता. 30) होणार आहे. ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी 10 वा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. माधवराव चितळे आदींच्या उपस्थितीत उद्‌घाटन सोहळा होणार आहे. रविवारी (ता. 31) परिषदेचा समारोप होणार असून, परिषदेच्या वतीने चंद्रकांत कुलकर्णी (हिंगोली), रामेश्वर मांडगे (हिंगोली), आर. टी. देशमुख (परभणी), प्रताप काळे (परभणी) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. परिषदेत पाणी व्यवस्थापनावर तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने होतील.
Web Title: parbhani marathwada news maharashtra irrigation conferance