मोटारसायकल अपघातात फौजदाराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

परभणी - अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे ताडकळस (ता. पूर्णा) पोलिस ठाण्यातील फौजदार सुनील शेषराव वाघमारे (वय 37, रा. अंबुलगा, जि. नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला. ब्राह्मणगाव पाटीजवळ गुरुवारी (ता.29) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. वाघमारे हे हवालदार किशोर गुडेटवार यांच्यासोबत लातूर येथे बंदोबस्तासाठी मोटारसायकलवरून निघाले होते. ब्राह्मणगाव पाटीजवळ मोटारसायकलची वाहनाशी जोरदार धडक झाली. त्यात दोघे फेकले गेले. त्या वेळी दुसऱ्या वाहनाखाली सापडून वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला.
Web Title: parbhani marathwada news police officer death in accident