गोमांस नेताना दोघांना पकडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

परभणी - गोवंशाचे मांस विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना नानलपेठ पोलिसांनी गुरुवारी (ता.29) अटक केली. त्यांच्याकडून दहा हजारांच्या गोमांसासह रिक्षा जप्त करण्यात आली. शहरात एका रिक्षातून गोवंशाचे मांस नेले जात असल्याची माहिती काही नागरिकांनी नानलपेठ पोलिसांना दिली. पोलिसांच्या पथकाने तत्काळ धाव घेऊन रिक्षाची तपासणी केली असता तथ्य आढळले. पोलिसांनी रिक्षातील मल्हारी ऊर्फ बंडू विश्वनाथ आळणे, मोहंमद हारून मोहंमद करीम या संशयितांना ताब्यात घेतले. रिक्षा जप्त केली.
Web Title: parbhani marathwada news two arrested