परभणी महापालिकेते तिसऱ्यांदा महिलाराज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

परभणी : परभणी शहर महापालिकेच्या महापौरपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाले असून एकूण तीन महापौरांपैकी दोन महिलांना यापूर्वी महापौर होण्याची संधी मिळाली आहे. तर आता पुन्हा तिसऱ्या वेळेसही महापौरपद महिलांच्या ताब्यात जाणार आहे. त्यामुळे पहिले महापौर प्रताप देशमुख वगळता अन्य पुरुष नगरसेवकांचे महापौर पदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. त्यांना उपमहापौर पदावरच समाधान मानावे लागत आहे. सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्या अनिता रवि सोनकांबळे यांचा दावा पक्का झाल्याचे मानले जात आहे.

मुंबई येथे बुधवारी (ता.१३) राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत झाली. त्यामध्ये परभणी महापालिकेचे महापौरपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेवर कॉंग्रेस पक्षाची सत्ता असून या पक्षाच्या नगरसेविका अनिता सोनकांबळे यांचे पती रवि सोनकांबळे हे विद्यमान महापौर मीना वरपुडकर व आमदार सुरेश वरपुडकर यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे या पदावर त्यांचीच वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

परभणी महापालिका सन २०११-१२ मध्ये स्थापित झाल्यानंतर पहिले महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी होते. तेव्हा महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सत्ता होती व पहिले महापौर होण्याचा मान प्रताप देशमुख यांना मिळाला होता. तर दुसरे महापौरपद इतर मागास वर्ग (महिला) साठी राखीव होते. या वेळी राष्ट्रवादीच्या संगीत राजेंद्र वडकर यांना ही संधी मिळाली होती. सन २०१७ मध्ये झालेल्या दुसऱ्या निवडणूकीत पहिल्या अडीच वर्षासाठी महापौरपद हे खुल्या (महिला) प्रवर्गासाठी आरक्षीत होते. तेव्हा विद्यमान महापौर मीना वरपुडकर यांची निवड झाली तर आता चौथे महापौरपद अनुसूचित जाती (महिला) साठी आरक्षीत झाले आहे. म्हणजे चार पैकी तीन वेळेस महापालिकेवर महिला राज आले आहे.

राष्ट्रवादी, भाजपतही महिला सदस्या...
महापालिकेच्या प्रभाग तीन ‘अ’ म्हणून निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या अनिता सोनकांबळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नम्रता संदीप हिवाळे या प्रभाग सहा (अ), डॉ. वर्षा संजय खिल्लारे या प्रभाग १० (अ) मधून तर भारतीय जनता पक्षाच्या मंगल मुदगलकर या प्रभाग १५ (अ) मधून निवडून आल्या आहेत.  जर निवडणूक झाली तर राष्ट्रवादीच्या सदस्या मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
.......

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani municipality for the third time