परभणी, नांदेडचा पारा 44 अंशांवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

औरंगाबाद - मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट असून, सर्वाधिक कमाल तापमान परभणीत 44.1 अंश नोंदले गेले. त्यानंतर नांदेडचा क्रमांक असून तेथे 44.0 अंश तापमान होते. उस्मानाबाद, बीड, हिंगोली, जालन्याचे कमाल तापमान 41, तर लातूरला 39 अंश सेल्सिअस नोंदले गेले. तप्त उन्हाच्या झळांनी जनजीवन विस्कळित होत असून भरदुपारी बाहेर पडणे मुश्‍कील झाले आहे. 

Web Title: Parbhani Nanded temperature 44 degrees