परभणी: प्रशासनाचा वाळू तस्करांवर कारवाईचा बडगा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

पावसाने गेल्या महिन्याभरापासुन दडी मारल्याने व गोदावरी नदी कोरडी पडल्यामुळे वाळू तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे.तालुक्यातील सर्व रेती घाट बंद झाले आहेत .तालुक्यातील वाळु साठे जप्त करुन महसुल प्रशासनाने साठे असलेल्या शेतकऱ्यांच्या सातबारा वर बोजा टाकला आहे. त्या मुळे  वाळू तस्करांनी गोदावरीत रेती चोरण्यास सुरुवात केल्याने प्रशासनाने या  वाळू तस्करांच्या विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

सोनपेठ : सोनपेठ महसुल व पोलिस प्रशासनाने वाळू तस्करांच्या विरुद्ध कठोर कारवाई करत आठवडाभरात चार जेसीबी, टीप्पर व अनेक ट्रॅक्टर जप्त करुन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पावसाने गेल्या महिन्याभरापासुन दडी मारल्याने व गोदावरी नदी कोरडी पडल्यामुळे वाळू तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे.तालुक्यातील सर्व रेती घाट बंद झाले आहेत .तालुक्यातील वाळु साठे जप्त करुन महसुल प्रशासनाने साठे असलेल्या शेतकऱ्यांच्या सातबारा वर बोजा टाकला आहे. त्या मुळे  वाळू तस्करांनी गोदावरीत रेती चोरण्यास सुरुवात केल्याने प्रशासनाने या  वाळू तस्करांच्या विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वाणी संगम येथुन अवैध वाळू चोरुन वाहतुक करणारे पाच ट्रँक्टर महसुल व पोलिसांच्या पथकाने पकडुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली .त्या नंतर पोहंडुळ येथे अवैध रित्या मुरुम काढणाऱ्या जेसीबी व वाहानावर पोलिस कारवाई केली त्यांच्या विरुद्ध गौण खनिज अधिनियमा नुसार कारवाई करुन वाहाने जप्त केली.

शेळगाव येथे एका शेतकऱ्याच्या शेतात जप्त केलेला वाळुचा साठा  वाळू तस्कर पळवुन नेत असल्याचे शेतकऱ्याने प्रशासनाला कळवले त्या वरुन शेळगाव येथील पोलिस पाटील यांच्या तक्रारी वरुन पोलिसात एक जेसीबी व टिप्पर या सह तीन जणावर  वाळू चोरी प्रकरणी सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी हि वाहाने सुध्दा जप्त केली आहेत .सोनपेठ पोलिसात आठवडाभरा पासुन गौण खनिज प्रकरणी गुन्हा दाखल करणे व वाहाने जप्त करण्याची कारवाई सुरुच आहे.या आठवड्यात.सोनपेठ पोलिसात गौण खनिज चोरी प्रकरणी चार गुन्हे दाखल झाले आहेत यात चार जेसीबी दोन टिप्पर व ट्रँक्टर यासह बारा जणांवर महाराष्ट्र गौण खनिज अधिनियम ४७(७)(८) नुसार गुन्हा दाखल करण्यात.आला आहे .यातील वाहाने जप्त करण्यात येत असुन आरोपींना ही अटक करुन न्यायालयात हजर केले आहे आता पर्यंत १२ लाख रु दंड या  वाळू तस्करांकडुन वसुल करण्यात आला आहे .हा कारवाईत तहसीलदार जिवराज डापकर सहाय्यक पोलिस निरीक्षक सदानंद येरेकरे फौजदार बाबुराव  जाधव फौजदार संतोष मुपडे  मंडळ अधिकारी शिवाजी कराड यांच्या सह पोलिस व महसुल विभागातील तलाठी कर्मचारी व पोलिस पाटील सहभागी झाले आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Parbhani news action against sand mafia