Parbhani Mass Marriage
Parbhani Mass Marriage

सामुदायिक सोहळ्यात ७५ जोडपी विवाहबद्ध

परभणी : जिंतूर रोडवरील महात्मा फुले हायस्कूलच्या प्रांगणात शनिवारी (ता. तीन) ७५ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा थाटात पार पडला. सोहळ्यात ६५ बौद्ध तर १० जोडप्यांचे हिंदू विवाह पद्धतीने लग्न लावले. मान्यवरांसह वराडी मंडळांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

संबोधी अकादमी व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित हा आठरावा विवाह सोहळा होता. माजी न्यायमूर्ती तथा राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी. एल. थूल, जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर, पोलिस अधीक्षक दिलीप झळके, आमदार डॉ. राहुल पाटील, मत्स विभागाचे उपायुक्त अभय देशपांडे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर, भगवान वीर, विजय साळवे, माजी विशेष लेखा परीक्षक वाय. एस. बागडे, समाजकल्याण अधिकारी श्रीमती भोजने, छाया कुलाल, राजू एडके, कार्यकारी अभियंता बाबूराव आदमाने, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, कैलास कांबळे, पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, उपशिक्षणाधिकारी देविदास इंगोले आदी मान्यवर प्रमुख पाहुणे होते.

सोहळ्यात कादगपत्रांची पूर्तता करणाऱ्या २० जोडप्यांना कन्यादान योजनेंतर्गत २० हजारांचा धनादेश देण्यात आला. महापालिकेकडून स्वच्छता व पाणीपुरवठा तर जिल्हा रुग्णालयाकडून आरोग्य पथक तैनात होते. दि. फ. लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. भगवान जगताप यांनी आभार मानले.

डॉ. अरविंद सावते, सिद्धार्थ भराडे, भीमराव पतंगे, बबन शिंदे, बी. आर. आव्हाड, डी. आर. तुपसमिंदरे, विश्वनाथ दबडे, अविनाश मालसमिंदर, नवनाथ जाधव, भगवान मानकर, ममता पाटील, ज्ञानेश्वर हरकळ, धनंजय रणवीर, राजेश चांदणे, रामप्रसाद घुगे, बद्रीनाथ घुले, बालाजी भुसारे, बाबासाहेब भराडे, सुंदर चव्हाण, विशाल जल्हारे आदींनी यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com