परभणी : कचरा गाडी अंगावरून गेल्याने अडीच वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

परभणी महापालिकेकडून कचरा गोळा करण्यासाठी एमएच 22 डी-7854 क्रमांकाचे वाहन आनंद नगरात गेले होते.

परभणी : महापालिकेकडून कचरा गोळा करणारे वाहन अंगावरून गेल्याने अडीच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. परभणीतील आनंद नगरात रविवारी (ता.28) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

परभणी महापालिकेकडून कचरा गोळा करण्यासाठी एमएच 22 डी-7854 क्रमांकाचे वाहन आनंद नगरात गेले होते. तिथे हे वाहन अडीच वर्षीय शिवन्य भोलेनाथ वाकोडे हिच्या अंगावर गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तदनंतर वडील भोलेनाथ देविदास वाकोडे यांनी नवामोंढा पोलिसांत फिर्याद दिली.

वाहनचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून अंगावर घातल्याने मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यावरून संबंधीत वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मोंढा ठाण्याचे कर्मचारी श्री कोकाटे यांनी दिली. फौजदार राजेश मलपील्लू अधिक तपास करीत आहेत.

Web Title: parbhani news: child die in accident of garbage vehicle