परभणी: सेलूत अाजी-माजी नगरसेविकेच्या गटात हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

शिवाजीनगर येथिल विद्यमान नगरसेविका उषा दौड अाणि माजी नगरसेविका मंगल कथले यांच्या समर्थक गटात जून्या वादावरून मंगळवारी बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली.

सेलू : शहरातील शिवाजी नगरात अाजी-माजी नगरसेवकांच्या गटात जुन्या वादावरून आज (मंगळवारी) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास लाठ्या, काठ्या, चाकूने तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही गटाचे मिळून पाचजण जखमी झाले अाहेत.

शिवाजीनगर येथिल विद्यमान नगरसेविका उषा दौड अाणि माजी नगरसेविका मंगल कथले यांच्या समर्थक गटात जून्या वादावरून मंगळवारी बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली. यात दिलीप दौड, योगेश कथले, बबन दौड, रमेश दौड,अाश्विन सासवडे हे पाच जण जखमी झाले अाहेत.

डोक्याला मार असल्याने योगेश कथले अाणि बबन दौड यांना परभणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात अाले अाहे .दरम्यान दोन्ही गटाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सेलू पोलिस ठाण्यात सुरू अाहे.

Web Title: parbhani news clash between two groups in Selu