परभणीः दुर्मिळ जातीचा सरडा आढळला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

परभणीः येथील बेलेश्वर नगर मध्ये राहणारे सचिन साहेबराव देशमुख यांच्या घराजवळ दुर्मिळ जातीचा सरडा बुधवारी (ता.10) आढळला. सर्पमित्रांनी या सरडा ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता तो कॉमन ब्लड शुकर या नावाचा असल्याचे समजले.

या संदर्भात सर्पमित्र विकास शेटे यांनी सांगितले की, हा सरडा कोकण व गडचिरोली येथे आढळतो, हा सरडा परभणी शहरात आढळून आल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. या सरड्याचे नाव कॉमन ब्लड शुकर असे आहे. हा सरडा जमीन पोखरून त्यामध्ये आपले घर करून राहतो. जमीनीवरील व जमनीखालील किटक खातो. गेल्या 27 वर्षापासून सर्पमित्रांनी वन्यजीव व सर्प वाचविण्यासाठी जी चळवळ उभी केलेली आहे. त्यातून हजारो साप, प्राणी, पक्षी वाचवले आहेत. त्यांना जीवदान दिले आहे.

परभणी शहरात एक सर्पमित्राची मोठी साखळी तयार केली आहे. परभणी शहरातील सर्पमित्राच्या पुढाकारातून एक सर्पोद्यान विकसीत करावे, अशी मागणी सर्पमित्रांनी केली आहे. या संदर्भात महापालिकेच्या सभेत ठराव देखील घेण्यात आला आहे. त्यासाठी राजगोपालाचारी पार्कात जागा देखील निश्चित करण्यात आली आहे. अशी माहिती विकास शेटे यांनी दिली.

'ई सकाळ'वरील महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: parbhani news common blood shuker found