चिखलात फतकल मारून बसत राहूल गांधींनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

rahul gandhi
rahul gandhi

व्यासपीठावरुन बोलणे टाळत थेट खाली  उतरून चिखलात फतकल मारून बसत राहूल गांधी यांनी साधला शेतकरी व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाशी संवाद.

राहूल गांधी यांची एरंडेश्वर (ता. पूर्णा) येथील व्यंकटेश काळे यांच्या फार्महाउस वर आज (शुक्रवार) )सभा आयोजित करण्यात आली होती. दुपारी दोन वाजता राहुल गांधी यांचे आगमन झाले. यावेळी व्यासपीठावर अहमद पटेल, कर्नाटकचे माजीमुख्यमंत्री मलीकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब विखे पाटील, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, रजनीताई पाटील, नसीमखान, प्रकाश सामंत, राजीव सातव, सुरेश वरपुडकर, आणासाहेब काळे, सरपंच दुर्गेश्वरी काळे, राजेश काळे, संयोजक व्यंकटेश काळे आदी उपस्थित होते.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रास्ताविक केले यावेळी त्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली. यावेळी वयोवृद्ध शेतकरी बालासाहेब काळे यांनी जनतेतून प्रश्न विचारला अन...दुसऱ्याच क्षणी कठड्यावरुन अचानक उडी मारून व सुरक्षा कडे तोडीत राहुल गांधी यांनी त्यांच्या जवळ जावून रात्रीच्या पावसामुळे चिखल झालेला असताना सुद्धा जमिनीवर फतकल मारली व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्या या पावित्र्यामुळे सुरक्षा यंत्रणेची मोठी तारांबळ उडाली. यावेळी त्यांनी आत्महत्या केलेल्या तेरा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. यावेळी त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. शेतकरी आत्महत्याच करणार नाहीत यासाठी काय करावे लागेल असा गांधी यांनी सवाल करून त्यांचे मत जाणून घेतले.

व्यंकटेश काळे यांनी "हमे मन की बात करनेवाली सरकार नही चाहिए दिलसे काम करनेवाली चाहिए"असे त्यांना म्हणताच राहूल गांधी यांनी ऐसी सरकार कौन दे सकता है? असा सवाल केला त्यावेळी असंख्य शेतकऱ्यांनी सिर्फ काँग्रेस असे उत्तर दिले. या संवादादरम्यान राहूल गांधी यांनी हे सरकार शेतकरी, शेतमजूर, नौकरदार, लघु उद्योजक, छोटे व्यापारी यांचे नसून बड्या उद्योगपतींचे आहे असा आरोप केला. नोटाबंदी निर्णयाचा खरपूस समाचार घेत त्यांनी त्यातून काय साधले? तुमच्या कर्ज माफीचा किती जणाना फायदा झाला? पदरात काय पडले? पिकविम्यासाठी किती बेजार केले? असे अनेक सवाल उपस्थित केले. यावेळी जीएसटी वरही टीका केली. आज देशात केवळ सामान्य माणूसच बेजार असल्याचे मत प्रदर्शीत केले. हे सरकार पिळवणूक करणारे व खोटे आश्वासन देणारे असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

सूत्रसंचालन सुरेश वरपुडकर यांनी केले व्यंकटेश काळे यांनी आभार मानले. प्रमुख उपस्थितात डॉ. संजय लोलगे, आण्णासाहेब काळे, राजेश काळे, गावाच्या सरपंच दुर्गेश्वरी काळे, अशोक साळवे, अब्दुल वहिदसेठ, किसन काळे यांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com