परभणी : उपभियंत्यासह सहाजणांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

बोगस दान पात्राच्या आधारे शासकीय विहीर लाटली

जिंतूर : तालुक्यात शासकीय विहीर घेण्यासाठी बोगस दानपत्राच्या आधारे जमीन दिली खरी. परंतु काम पूर्ण होताच सदरील जमीन दुसऱ्याच्या नावे असल्याचे उघडकीस आल्याने उपभियंत्यासह सहा जणांवर बामणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात सोमवारी (ता.दहा) ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कंत्राटी अभियंता नंदकुमार आष्टीकर यांनी बामणी पोलिसात तक्रार दाखल केली की बोगस दानपत्र करून देणारे भिका महादू दैड, तत्कालीन सरपंच नामदेव जयभाये, ग्रामसेवक पी. टी. पोले, पाणीपुरवठा समितीचे सचिव श्रीमती जायभाये, उपअभियंता सत्तार सिद्दीकी, तांत्रिक सल्लागार बी.एन. डोली यांनी मौजे अंगलगाव येथे भारत निर्माण योजनेअंतर्गत गट नं 219 मध्ये विहीर खोदली.

सदरील विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर ही विहीर दानपत्र लिहून देणारा भिका महादू धैड याने बोगस दानपत्र दिल्याचे उघड झाले. त्यास इतर पाच जणांनी साहाय्य केले होते. यावर बामणी पोलिसांनी वरील आरोपिविरुध्द फसवणूक करणे, बनावट कागद पत्रे तयार करणे, व तो खरा असल्याचे भासवणे आदी कलमाणे गुन्हा दाखर करण्यात असला आहे. या प्रकरणाचा तपास पो नि पल्लेवाड हे करीत आहेत.

Web Title: parbhani news corruption engineers booked