परभणी : पीकविमा भरण्यासाठी शेतकर्‍यांची रविवारीही गर्दी

विलास शिंदे
रविवार, 30 जुलै 2017

शेतकरी आपल्या पिकांचे विमा संरक्षण केले तर त्यांच्या पिकांना नैसर्गिक आपत्तीमुळे काही नुकसान झाले तर त्यांची भरपाई विमा कंपनी देत असते. यामुळे शेतकरी आपल्या पिकांचा विमा उतरवुन घेत आहे. तालुक्यामध्ये बँक तसेच महा ई सेवा या ठिकाणी शेतकरी विमा भरण्यासाठी गर्दी करत आहेत.

सेलू : पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत पिकांचा विमा भरण्यासाठी अावघे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने शासनाने पिक विमा स्विकारण्यासाठी रविवारीही संबधित बॅका उघड्या ठेवण्यासंदर्भात अादेश दिल्याने शेतकर्‍यांनी रविवारी (ता.३०) रोजी बॅकेत एकच गर्दी केली.बॅकांनी अाॅफलाईन अर्ज स्विकारणे सुरू केले असले तरी अद्याप तालूक्यातील बहूतांश शेतकर्‍यांचा पिक विमा भरणे बाकी राहिल्याने पिक विमा भरण्यासाठी शासनाने मुद्दत वाढवून द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांतून होतांना दिसत अाहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना केंद्र स्तरावरुन कार्यन्वित करण्यात आली आहे. यामध्ये खरिप व रब्बी पिकांचे विमा संरक्षण करण्यात येते. शेतक-यांनी पेरणी केलेल्या पिकांना या संरक्षणाचा लाभ देण्यात येत आहे. निसर्गाचा लहरीपणा यामुळे अवेळी पडणारा पाऊस, तसेच दुष्काळी परिस्थितिमुळे नापिकी यासर्व बाबींचा विचार करुन शेतकरी जगला पाहिजे हा हेतु डोळ्यासमोर ठेवुन पिकांना विमा, संरक्षण देण्यात आले. यामुळे सतत नापिकी दुष्काळ यामुळे पेरणी केलेली बियाणे, शेतीला लागणारा खर्च मिळणे ही दुरापस्त होवु लागल्याने उत्पन्न घटु लागले यामुळे शेतकरी कर्जबाजारी होवुन या नैसर्गिक संकटामुळे आत्महत्या सारखे पर्याय शोधु लागला.

शेतकरी आपल्या पिकांचे विमा संरक्षण केले तर त्यांच्या पिकांना नैसर्गिक आपत्तीमुळे काही नुकसान झाले तर त्यांची भरपाई विमा कंपनी देत असते. यामुळे शेतकरी आपल्या पिकांचा विमा उतरवुन घेत आहे. तालुक्यामध्ये बँक तसेच महा ई सेवा या ठिकाणी शेतकरी विमा भरण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यातच विमा उतरविण्याची अंतिम (ता.३१) असल्या कारणाने शेतकरी विमा भरण्यासाठी गर्दी करत असुन बँकांना जत्रेचे स्वरुप आले आहे. पिक विमा भरण्यासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करणे अपेक्षित असल्या कारणाने महा ई सेवा केंद्र तसेच नेट कॅफे, याठिकाणी रात्रीच्या वेळी  सुद्धा शेतकरी पिक विमा भरण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत. शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्या कारणाने शेतकरी पिक विमा भरण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र अाहे.रविवारी व सोमवारी या दोन दिवसात शेतकर्‍यांना पिक विमा भरणे मुश्किल झाले असल्याने पिक विमा भरण्यासाठी शासनाने मुद्दत वाढवून द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांतून जोर धरू लागली अाहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Parbhani news crop insurance farmer