परभणीः थेट प्रवेशासाठी कृषी विद्यापीठात गर्दी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमाच्या 2017-18 मधील थेट प्रवेशासाठी आज (बुधवार) विद्यार्थी, पालकांनी विद्यापीठातील केंद्रात मोठी गर्दी केली होती.

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमाच्या 2017-18 मधील थेट प्रवेशासाठी आज (बुधवार) विद्यार्थी, पालकांनी विद्यापीठातील केंद्रात मोठी गर्दी केली होती.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील कृषी, उद्यानविद्या, कृषी व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन, कृषी अभियांत्रीकी, अन्‍नतंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान, कृषी अभियांत्रिकी या शाखांच्या आभ्यासक्रमांच्या 2017-18 पदवी प्रवेशासाठी ता.10 जुले पर्यंत ऑनलाईनवर महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण परिषदेने अर्ज मागविले होते. त्यानंतर आलेल्या अर्जातून सुरुवातीला मेरीट प्रमाणे प्रकीया राबविण्यात आली.तीन फेऱ्यात जवळपास 12 हजाराहून अधिक जागा भरण्यात आल्या होत्या.  आता शेवटचा टप्पा असलेला थेट प्रवेश प्रक्रिया अर्थात स्पॉट अॅडमिशन सुरु झाले आहेत. सोमवारी (ता. 28) पासून ही प्रक्रिया विद्यापीठातील तीन केंद्रात सुरु झाली आहे. कृषी महाविद्यालय, अन्नतंत्र, अभियांत्रीकी महाविद्यालय येथील केंद्रात सुरु झाली आहे. मराठवाड्यातील विविध खाजगी महाविद्यालयाचे प्रतिनीधी यासाठी विद्यापीठातील केंद्रात दाखल झाले आहेत. सर्वाधीक जागा या कृषी महाविद्यालयाच्या असल्याने विद्यापीठात असलेल्या कृषी महाविद्यालयात मोठी गर्दी झाली होती. महाविद्यालयाच्या सभागृहात थेट प्रवेशाची प्रकिया सुरु झाली आहे. बुधवारी यासाठी विद्यार्थी, पालकांनी मोठी गर्दी केली होती. गुरुवार पर्यंत ही प्रकिया सुरु राहणार आहे.

प्रवेश प्रकिया दोन तास ठप्प
कृषी महाविद्यालयात प्रवेश प्रकिया सुरु असताना दुपारी एकच्या दरम्याण पालकांनी आक्षेप घेत प्रकिया दोन तास बंद पाडली. बुधवारी 65 ते 80 टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते. मात्र, यावेळी 90 टक्याच्या वर गुण असणारेही विद्यार्थी आल्याने त्यावर आक्षेप घेत प्रकियेत गोंधळ घातला. परंतु काही तासांनी पुन्हा प्रकिया सुरु करण्यात आली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन 

Web Title: parbhani news Crowds at the Agricultural University for Direct Admission