यापूढे शेतकर्‍यांनो हातात रूमणे घेवून घ्या: आमदार विजय भांबळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

राष्ट्रवादी काँग्रेसचा सेलू तहसिल कार्यालयावर  मोर्चा

सेलू (परभणी): गेल्या दीड महिण्यांपासून तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्‍यांचे सोयाबीन, मुग, उडीद ही पेरणी केलेली पिके हातची गेली. अधिवेशनात शासनाने कुठलाही ठोस निर्णय घेतला नसल्याने केवळ शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली असून, या सरकारला शेतकर्‍यांच्या व्यथा काय असतात हेच समजत नसल्याने यापूढे होणार्‍या मोर्चात शेतकर्‍यांनो हातात रूमणे घेवून या, असे आवाहन आमदार विजय भांबळे यांनी आज (बुधवार) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसिल कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी शेतकर्‍यांना केले.

यावेळी राष्र्टवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजाणी दुर्राणी, जिल्हा परिषदेचे सभापती अशोक काकडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाने, रामराव उबाळे, पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम पावडे, उपसभापती गोरख भालेराव, डॉ. संजय रोडगे, सारंगधर महाराज रोडगे, विनायक पावडे, अॅड. बाळासाहेब रोडगे, राष्ट्रवादीचे तालूकाध्यक्ष माऊली ताठे, शहराध्यक्ष भारत इंद्रोके, सचिन शिंदे, गौस लाला, गौतम साळवे, अज्जु कादरी, मिनाताई घोगरे, पंचायत समिती सदस्य आनंद डोईफोडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना आमदार भांबळे म्हणाले की, सरकारने शेतक-यांची फसवी कर्जमाफी केली असून थोड्या फार प्रमाणात शेतकरी या कर्जमाफी मध्ये बसत आहेत. पावसाने दीड महिन्यापासुन उघडीप दिली असल्याने सोयाबीन, मुग, उडीद ही पेरणी केलेली पिके करपली असुन शासनाने कुठलाही निर्णय तत्काळ घ्यावयास हवा होता. परंतु, तसे झाले नाही. सरकार शेतक-यांना वेठिस धरत आहे. हे सरकार कर्जमाफी करणारे सरकार नसून शेतकर्‍यांची कर्जवसुली करणारे सरकार असल्याचे ही श्री. भांबळे म्हणाले.

मराठवाड्यात पाऊस नसल्याने तत्काळ मराठवाडा दुष्काळग्रस्त म्हणुन जाहीर करावा, तसेच शेतमजुरांच्या हातांना काम द्यावे, मागासवर्गीय महामंडळाचे कर्जमाफ करावे अशा विविध मागण्या या मोर्चाच्या वेळी करण्यात आल्या. यावेळी आमदार बाबाजाणी दुर्राणी बोलतांना म्हणाले की, शेतक-यांच्या प्रती सरकारची दुटप्पी भुमिका आहे. एकीकडे निसर्ग साथ देत नाही तर दुसरीकडे सरकार जगू देत नाही अशी परिस्थिती शेतक-यांची झाली आहे. केवळ अश्वासनाशिवाय मुख्यमंत्री काहीच करत नाहीत. शेतीच्या मालाला हमी भाव नाही. शेतक-यांचा माल विकल्यावर शासन भाव वाढ करत आहे. अशी विचित्र भुमिका शासनाची आहे. एकीकडे पंतप्रधान म्हणात शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट झाले पाहीजे. पाऊसच पडला नाही तर दुप्पट उत्पन्न पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे करणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी सारंगधर महाराज रोडगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या मोर्चाचा प्रारंभ शहरातील टिळक पुतळ्यापासुन झाला. पूढे मुख्य मार्गावरुन मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चेकरांनी विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना दिले. यावेळी तालूक्यातील हाजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: parbhani news farmer rally and mla vijay bhamble government