गंगाखेडमध्येही शेतकरी संपाचे पडसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

शासनाचा निषेध करित काही दुध विक्रेत्यांनी गावातच दुधाचे वाटप केले. भाजीपाल्याची चारा म्हणून उपयोग करत तो जनावरांना टाकण्यात आला. विक्री करण्यासाठी अन्नधान्य बाजार पेठेत आणले गेले नाही

गंगाखेड -  शेतकरी संपाचे गंगाखेड येथे आज (शुक्रवार) दुसऱ्या दिवशी तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.संपाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. 

जीवनावश्यक वस्तुंचा बाजार पेठेत येणारा पुरवठा कमी झाला. शासनाचा निषेध करित काही दुध विक्रेत्यांनी गावातच दुधाचे वाटप केले. भाजीपाल्याची चारा म्हणून उपयोग करत तो जनावरांना टाकण्यात आला. विक्री करण्यासाठी अन्नधान्य बाजार पेठेत आणले गेले नाही. तुरळक भाजीपाला बाजार पेठेत आल्याने भाजीपाल्याचे भाव वाढले.

या संपाचा फायदा घेत भाजीपाला अडते यानी कर्नाटक व आध्रा येथून नाशवंत नसलेला व आठ दिवसांनी खराब होणारा भाजीमाल बाजारात आणला. यात बटाटा, मिरची, कांदा, ढोबळी मिरची यांचा समावेश होता. संपाच्या दुस-या दिवशी शेतकऱ्यांत असंतोष खदखदत होता.

Web Title: Parbhani News: Farmer Strike in Gangakhed