परभणी: कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

खडका येथील अशोक सुंदरराव यादव (वय 45) या असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा बँकेचे व खाजगी कर्ज होते. त्यांच्या पश्चात तीन मुली व एक मुलगा आहे. दोन मुली लग्नाला आलेल्या आहेत.

परभणी - जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील खडका गावातील एका शेतकऱ्याने आज (बुधवार) सकाळी कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन सुरु असताना, मराठवाड्यात मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोनपेठ तालुक्यात घडली.

खडका येथील अशोक सुंदरराव यादव (वय 45) या असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा बँकेचे व खाजगी कर्ज होते. त्यांच्या पश्चात तीन मुली व एक मुलगा आहे. दोन मुली लग्नाला आलेल्या आहेत. या वर्षी चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा असताना पेरणीसाठी जुळवाजुळव करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. नोटबंदीमुळे ही शेतकऱ्यांना रोख पैसे मिळत नसल्याने शेतकरी समाजात मोठे नैराश्य पसरले आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
लातूर: मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून
अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
'सीएम'साहेब! जाळपोळ करणारे शिवसेनेवाले समजायचे का?​
नागालँड: चकमकीत जवान हुतात्मा, 3 दहशतवादी ठार​
लंडनवासीयांनी लुटला सांस्कृतिक कार्यक्रमांचा 'आस्वाद'​
बसोलीच्या कलावंतांनी साकारले अनोखे भित्तिचित्र​
कोहली फाउंडेशनच्या कार्यक्रमात मल्ल्या ‘बिन बुलाए मेहमान’​

Web Title: Parbhani news farmer suicide in sonpet tehsil