वडिलांनी आत्महत्या करू नये म्हणून तिने संपविले जीवन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

पाथरी (परभणी): वडिलांवर असलेला कर्जाचा बोझा आणि कर्ज काढून केलेली पेरणी पाऊस नसल्याने वाया गेल्याने वडिलांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, म्हणून एका तरूणीने मंगळवारी (ता.आठ) आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्याची ह्रदयद्रावक घटना तालूक्यातील जवळाझुटा येथे घडली. पोलिस पंचनाम्यम्याध्ये सुसाईड नोट आढळून आली आहे.

पाथरी (परभणी): वडिलांवर असलेला कर्जाचा बोझा आणि कर्ज काढून केलेली पेरणी पाऊस नसल्याने वाया गेल्याने वडिलांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, म्हणून एका तरूणीने मंगळवारी (ता.आठ) आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्याची ह्रदयद्रावक घटना तालूक्यातील जवळाझुटा येथे घडली. पोलिस पंचनाम्यम्याध्ये सुसाईड नोट आढळून आली आहे.

पाथरी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस नाही. खरिपाची पेरणी पूर्णतः वाया गेली आहे. शेतातील पिके करपून जात आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी चिंतेत आहेत. बँकेच्या कर्जमाफीचा अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला नाही. त्यातच शेतकरी प्रचंड मानसिक तणाव खाली आहेत. तीन ऑगस्ट रोजी जवळाझुटा येथील चंडिकादास झुटे या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. या घटनेच्या सहा दिवसानंतर चंडिकादास झुटे यांच्या भावाची मुलगी सारीका सुरेश झुटे (वय 17) या बारावीत शिक्षण घेत असलेल्या तरुणीने वडीलांवरचा कर्जाचा बोजा आणि चुलत्याने कर्जापाई केलेली आत्महत्या या गोष्टींचा तणाव सहन न झाल्याने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. सुरेश झुटे यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. एका मुलीचे गतवर्षी लग्न झाले. तर दोन मुले शिक्षण घेत आहेत. मयत मुलगी बारावीत शिक्षण घेत होती. त्याना 17 एकर शेतजमीन असून, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा बँकेचे त्यांच्या कडे कर्ज होते.

सारीका ही बीड जिल्ह्यातील शिवणी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. पंचमीच्या सणाला ती गावाकडे आली होती. त्याच वेळी तिचे चुलते चंडिकादास यांनी पाऊस नसल्याने शेती पीक वाया गेले, या चिंतेत आत्महत्या केल्याची घटना घडली. सारीका हिच्या बहिणीचे गत वर्षी लग्न झाले. लग्नासाठी वडिलांनी कर्ज काढले होते. वडिलांवर कर्जाचा बोजा आणि यावर्षी पुन्हा पावसाअभावी शेतातील पिके जळून जात. वडिलांनी कर्ज काढले होते. वडिलांवर कर्जाचा बोजा आणि या वर्षी पुन्हा पावसाअभावी शेतातील पिके जळून जात असल्याने तिच्या वडिलांचे हाल आणि ताण तिला पाहवत नव्हते. जुने कर्ज फिटले नाही, आणि वडिलांवर लग्नाची जबाबदारी ह्या चिंतेत सारीका असताना तिच्या चुतल्याप्रमाणे वडिलांनी आत्महत्या करू नये, म्हणून सारीका हिने जीवन संपविले. ह्रदयाला पाझर फोडणारी घटना सध्याच्या वाईट परिस्थितीचे चित्र दर्शवित आहेत.

Web Title: parbhani news girl student suicide in pathri