सारिका झुटे आत्महत्या प्रकरण; परदेशातील तरुणांनी केली मदत

धनंजय देशपांडे
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

सदरील घटना आम्ही  ‘ई-सकाळ’च्या माध्यमातून परदेशात नोकरीसाठी वास्तव्यास असलेल्या आम्ही भारतीय तरुणांनी वाचली. आणि मदत करण्याचे ठरवले त्याप्रमाणे आम्ही मदत केली आहे.
-अध्यक्ष अमोल साईनवार (लंडन)

पाथरी : निसर्गाने डोळे वटारल्यानंतर मृत्यूला जवळ करणाऱ्या सारिका झुटे या तरुणीच्या कुटूंबियांना विदेशात असलेल्या भारतीय तरुणांनी मदतीचा हात म्हणून रोख दहा हजार रुपयांची मदत केली. सारिकाच्या आईला मदत करताना उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.

सतत नापिकी व कर्जबाजारीपणामुळे जवळाझुटा (ता.पाथरी) येथील शेतकरी चंडीकादास झुटे यांनी ता. तीन ऑगस्टला विष पिवून आत्महत्या केली होती. सतत नापिकी व कर्जबाजारी व मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी घेतलेले कर्ज कसे फेडता येईल? या चिंतेने त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांची पुतणी सारिकाच्या लक्षात आले. हीच परिस्थिती आपल्या वडिलांची आहे. आपले वडीलही आपल्या शिक्षणासाठी व लग्नासाठी कर्ज घेतली व ते कर्जाची परतफेड न केल्याने आपले वडीलसुध्दा काकांसारखी आत्महत्या करतील? या भितीने सारिकाने मंगळवारी (ता.आठ) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेचे वृत्त ‘ई-सकाळ’ मधुन प्रसिध्द झाल्यानंतर ‘ई-सकाळ’ च्या माध्यमातून परदेशात नोकरीसाठी वास्तव्यास असलेल्या भारतीय तरुणांनी वाचली.  

पुणे येथील शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेद्वारे वेळोवेळी समाज कार्य करणाऱ्या या तरुणांनी सारिकाच्या कुटूंबाला मदत करण्याचा निर्धार केला. यानंतर शुक्रवारी (ता.११) संस्थेचे विश्वस्त परसराम नरवाडे हे पाथरीत दाखल झाले. त्यांनी दुपारी जवळा झुटा येथे जाऊन सारिकाच्या आईची आस्थेवाईकपणे चौकशी करत सांत्वन केले. रोख दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली. कुठलाही संबंध नसताना विदेशातून आलेली मदत स्वीकारताना सारकीच्या आईसह उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. तर त्यांनी त्या घरातील चंडीकादास झुटे यांची पत्नी सविता झुटे यांच्याशी चर्चा करत त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी सर्वती मदत करण्याची तयारी दर्शवली. शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे या संस्थेचे अध्यक्ष अमोल साईनवार (लंडन), शिरीष मांड्या, आशिष कालावार या भारतीय तरुणांनी सारिकाच्या कुटूंबाला केलेली मदत उपयुक्त ठरणार आहे.

सदरील घटना आम्ही  ‘ई-सकाळ’च्या माध्यमातून परदेशात नोकरीसाठी वास्तव्यास असलेल्या आम्ही भारतीय तरुणांनी वाचली. मदत करण्याचे ठरवले त्याप्रमाणे आम्ही मदत केली आहे.
-अध्यक्ष अमोल साईनवार (लंडन)

वडिलांनी आत्महत्या करू नये म्हणून तिने संपविले जीवन

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: parbhani news girl student suicide pathri, help from abroad