पाटबंधारे विभागातील अभियंत्याच्या खुर्चीला शेतकऱ्यांनी अडकवले निवेदन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

जायकवाडीचे पाणी लाभक्षेत्रापर्यंत सोडण्याची मागणी

परभणी: खरीप पिकासाठी जायकवाडीच्या डाव्या कालव्याद्वारे सोडलेले पाणी परभणी, पूर्णा तालुक्यातील शिवारापर्यंत सोडण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात जबाबदार अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंते सलगरकर यांच्या खुर्चीला निवेदन अडकवले.

जिल्ह्यातील खरीप पिके पावसाअभावी वाळत आहेत. सोयाबीन, कापूस, मूग आदी खरिपाची पिके वाळत आहेत. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून जायकवीड धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी वरखेडपर्यंत (ता. पाथरी) सोडले जात आहे. सुरू असलेले पाणी सिंगणापूर, ताडकळसपर्यंत सुटणे आपेक्षति होते. परंतु, मागणी नाही हे कारण देत प्रशासनाने तत्याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप किसान सभेने केला आहे. प्रशासनाने कोठेही पाणी मागणी अर्ज करा असे जाहीर केले नाही, असे नमूद करीत परभणी, पूर्णा तालुक्यातील लाभ क्षेत्रातील सर्व टेलपर्यंत खरिपाच्या वाळत असलेल्या पिकांना तत्काळ पाणी सोडावे, सध्या वरखेडपर्यंत ५०० क्युसेस वेगाने पाणी सोडले जात असून त्याचा वेग ११०० क्युसेसपर्यंत वाढवावा, अशी मागणी किसान सभेने केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस कॉ. विलास बाबर, लिंबाजी कचरे, सुदाम गोरे, लक्ष्मण गोरे, सटवाजी गोरे, प्रल्हाद माने, माणिक गोरे, नारायण लबडे, भागीरथ गोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: parbhani news Irrigation Department engineer's chair and farmer